राष्ट्रीय मानवाधिकार संगठनेचे विदर्भ अध्यक्ष जावेद अली यांची मागणी.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मो. नं. 9420751809.
अहेरी हे अतिशय महत्वाचा तालुका असून उप जिल्हा रुग्णालय आहे मात्र याठिकाणी अतिशय महत्वाचे पद व डॉक्टर नाही.या ठिकाणी डेंटिस्ट डॉक्टर ची अतिशय महत्वाचे पद नाही. जनता आलापल्ली येथे खाजगी दवाखान्यात जाऊन हजारो रुपये खर्च करून उपचार करावे लागत आहे. अहेरी उपजिल्हा रुग्णालय असल्याने अहेरी येथे एटापल्ली. भामरागड. सिरोंचा. मुलचेरा तालुक्यातील रुग्ण रुग्णालयात येत असतात मात्र डॉक्टर नसल्याने आलापल्ली येथील खाजगी रुग्णालयात जाऊन हजारो रुपये खर्च करावे लागत आहे. करीता जिल्हा सल्यचिकित्सक डॉ,किलनाके यांनी या गंभीर विषयावर लक्ष देऊन डेंटिस्ट ची पुर्ण वेळ नियुक्ती करावी अन्यथा राष्टीय मानवाधिकार संगठण आंदोलन करणार.असा इशारा पत्रकातून केली आहे.

