आशिष अंबादे वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातून एक मोठी बातमी समोर येत आहे. काही दिवसापूर्वीच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यात आता वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे एका तरुणीने सोशल मीडिया फेसबूकवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात आक्षेपार्ह लिखान केल्याने आंबेडकर अनुयायामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. आरोपी तरुणीवर कारवाई कारवाईसाठी पुलगाव पोलीस स्टेशनबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात आली होती.
पुलगाव येथील एका तरुणीने फेसबूकवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह लिखान केल्याने पोलिसांनी या तरुणीवर तात्काळ कारवाई करत तरुणीला अटक केली. आंबेडकरी अनुयायानी पोलिस स्टेशन परिसरात गर्दी केल्याने पुलगाव शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून देवळी, वर्धा येथून पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा बोलवण्यात आला आहे.
वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव येथील एका तरुणीने फेसबुकवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात आक्षेपार्य लिखान केल्यानंतर मोठ्या प्रमाणात तणाव वाढला होता. भीम आर्मीचे नेते अंकुश कोचे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तरुणी विरुद्ध गुन्हा दाखल केला. भारतीय न्याय संहिताच्या कलम 196, 299, 353 (2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आक्षेपार्य लिखाण करणाऱ्या तरुणीला ताब्यात घेतले आहे.
देशातील प्रत्येक महापुरुषांनी महिला पुरुष आणि सर्व समाजाला न्याय, हक्क, अधिकार, शिक्षण देण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं अशा महापुरुषा बदल अशा प्रकारे सोशल मीडियावर आक्षेपार्य लिखाण करणे बोलणे योग्य नाही. त्यामुळे पुढे कुणी अशा प्रकारे सोशल मीडियावर बोलू नये अशी महाराष्ट्र संदेश न्युज सर्वांना मागणी करत आहे.

