युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ
सावनेर:- येथे ऑल इंडिया लाईफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडिया लियाफी या संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी केंद्र सरकार व एलआयसी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी LIC च्या स्थापना दिनी गुरुवार 1 सप्टेंबर पासुन विमा प्रतिनिधींचे विविध मागण्या संदर्भात सावनेर येथील एलआयसी कार्यालय समोर देशव्यापी असहकार आंदोलन सुरू आहे. अजुनही मागण्या मान्य नझाल्याने दिवसेंदिवस आंदोलन तीव्र होत असुन आज शुक्रवार 30 सटेंबर सावनेर एल.आय.सी. कायालयासमोर अभिकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित राहुन आंदोलन करण्यात आले. या आंदोनलास जवळपास एक महिना पुर्ण होत आहे. मागण्या मान्य न झाल्याने शुक्रवार ला मोठ्या प्रमाणात एल.आय.सी.अभिकर्त्यांनी एकञीत येऊन शासनाचे लक्ष वेधले.
आंदोलनाला यशस्वी करण्याच्या हेतूने येथील लियाफी संघटनेचे अध्यक्ष धनराज निकोसे यांच्या मार्गदर्शना खाली एलआयसी कार्यालयासमोर शेकडो अभिकर्त्यांनी असहकार आंदोलनात सहभागी झाले. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास हे आंदोलन असेच सुरू ठेऊन आपल्या हक्क अधिकारा करिता आमचा संघष सुरूच राहिल. असे संघटनेचे अध्यक्ष धनराज निकोसे यांनी सांगितले.
या आंदोलनाला सहभागी होण्याकरिता सकाळी १० वाजता पासूनच विमा अभिकर्त्यांनी स्वेच्छेने कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. तीन महिने हे असहकार आंदोलन संपूर्ण देशभर विविध चरणांमध्ये असेच चालणार असून शुक्रवार 30 सप्टेंबर ला विश्राम दिनी येथील एल आय सी कार्यालयात विमा प्रतिनिधी च्या आंदोलनामुळे एकही नवीन विमा पॉलिसी काढली गेली नाही. याप्रसंगी उपस्थित विमा प्रतिनिधींना वरिष्ठ अभिकर्ता माधव महल्ले, सेवक ढोले, शरद भेलकर, गणेश चौधरी, मनिषा नान्हे यांनी मार्गदर्शन केले.
विमा पॉलिसीवरील जीएसटी बंद व्हावा, पॉलिसी कर्जावरील व्याज कमी व्हावे, एलआयसीचे खाजगीकरण होऊ नये, विमा पॉलिसीची ऑनलाईन विक्री बंद करावी, विमा प्रतिनिधीच्या ग्रॅच्युटी मध्ये वाढ व्हावी, प्रतिनिधींच्या आरोग्य विम्यात वाढ व्हावी. अश्या विविध मागण्या विमा प्रतिनिधी व लियाफी संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा ईशारा याप्रसंगी लियाफी सावनेर शाखेचे अध्यक्ष धनराज निकोसे यांनी दिला.याप्रसंगी पारेश्वर निंबाळकर, विष्णू डाखरे, सोनल बागडे, किशोर गणविर,गजानन ढगे, दिपक निखाडे, विनोद वासाडे, रेखा खंडाईतकर, रवि डहाके, प्रशांत गजभिये आदि शेकडो अभिकर्त्यांची उपस्थिती होती.