✒️प्रशांत जगताप, प्रतिनिधी
कर्नाटक:- आज महिला अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. त्यात नराधम संत बाबा कडून पण महिलेवर अत्याचाराचे पण प्रमाण वाढले असल्याचे समोर येत आहे. एका संत बाबा ने दोन मुली वर अत्याचार केल्याचे घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या बाबाला बेड्या ठोकल्या असून ताब्यात घेतले आहे.
कर्नाटक येथील प्रसिध्द संत शिवमूर्ति शरणारू याने मुलीवर शारीरिक अत्याचार केल्याचा आरोपात अटक करण्यात आली आहे. कर्नाटक मधील चित्रदुर्ग जिल्हातील एक प्रभावशाली मठाचे महंत शिवमूर्ति शरणारू यांच्या विरोधात अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार केला म्हणून (पोक्सो) ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. महंत शिवमूर्ति शरणारू याच्यावर गुन्हा दाखल होताच मुरुघा मठातील विद्धार्थाना येथील सरकारी वसतिगृहात स्थानांतरित करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, संत शिवमूर्ति शरणारू याच्या विरोधात मंगळवारला त्यांच्याच मठात शिकणाऱ्या 15 आणि 16 वर्षाच्या दोन मुलींनी जानेवारी 2019 ते जून 2022 पर्यंत या संताने शारीरिक अत्याचार केला अशी पोलिसात तक्रार दाखल केली होती. या दोन मुली पैकी एक मुलगी ही दलीत समाजाची असल्यामुळे संत शिवमूर्ति शरणारू यांच्यावर पास्को ॲक्ट आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती (अत्याचार निवारण) कायद्या नुसार आरोप लावण्यात आले आहे.
एक आठवडा अगोदर संत शिवमूर्ति शरणारू यांचा विरोधात तक्रार दाखल केली होती. पण राजकीय दबाव असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली नाही. संत शिवमूर्ति शरणारू याला अटक करण्यात यावी म्हणून दलीत संघटनांनी मोठ्या प्रमाणात आंदोलने केली. त्यानंतर संत शिवमूर्ति शरणारू याला पोलिसांनी अटक करून विविध कलमा अन्वये पास्को व एससी/एसटी कायद्या नुसार मामला दाखल केला. हे प्रकरण समोर येताच पोलिसाचा चमुह लगातार मठ आणि वस्तीगृहाचा दौरा करत आहे.
हे संतापजनक प्रकरण समोर येताच राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगने संत शिवमूर्ति शरणारू यांचा विरोधात लावण्यात आलेल्या मुलीवर अत्याचाराची कर्नाटक पोलिसानं कडून सुरू असलेल्या तपासाची रिपोर्ट मागीतली आहे.

