प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विदर्भप्रमुख तथा युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष श्री किरण ठाकरे यांनी दर शुक्रवारी भरणाऱ्या शेतकरी न्याय दरबारात पिकविम्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. अनेक शेतकऱ्यांचे पंचनामे होऊन सुद्धा तक्रारी रिजेक्ट केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
लवकरच तहसीलदारांच्या कक्षामध्ये पिकविमा कंपनीचे जिल्हाप्रतिनिधी व पिडीत शेतकऱ्यांना सोबत घेऊन कैफियत मांडणार असल्याचे किरण ठाकरे यांनी सांगितले. शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास पुढील आंदोलनाची घोषणा करण्यात येईल.

