Monday, April 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

बीड: नगर आष्टी डेमू रेल्वे ठरतेय पांढरा हत्ती! खर्च चार लाखाचा उत्पन्न 160 रुपये.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 2, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
बीड: नगर आष्टी डेमू रेल्वे ठरतेय पांढरा हत्ती! खर्च चार लाखाचा उत्पन्न 160 रुपये.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

बीड:- नगर बीड परळी रेल्वे मार्ग व्हावा हे स्वप्न बीड करांनी नेहमीच पाहिलं. रेल्वेमुळे बीडच राजकारणही अनेक वेळा तापलं अनेकांनी राजकीय पोळी भाजली. हे स्वप्न आता पूर्ण झालं अशा अविर्भावी थाटात आष्टी नगर डेमू रेल्वेचं उद्घाटन झालं. मात्र या रेल्वेने दररोज चारच प्रवासी प्रवास करत असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. चाळीस रुपये तिकीट दराने 160 रुपये रेल्वेला उत्पादन होत आहे तर रेल्वेच्या एका फेरीसाठी तब्बल चार लाख रुपये खर्च होत असल्याचं उघडकीस आल आहे. त्यामुळे हि डेमू रेल्वे पांढरा हत्ती ठरत असल्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे.

नगर – बीड – परळी रेल्वे मार्गाचा प्रकल्प मार्च 2023 पर्यंत पुर्ण करायचे निर्देश आसतांना देखील अजून भुसंपादन प्रक्रियाच शिल्लक आहे. फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवुन असले उद्धघाटनाचा उपद्व्याप करण्यात आला अर्धवट कामाचे उद्घाटन कोणी करते का? जनतेला कुठपर्यंत फसवणार? असा प्रश्न उपस्थित करत. विद्यार्थी युवा रेल्वे कृती समीती बीड च्या वतीने समीती अध्यक्ष जयप्रकाश अघाव, उपाध्यक्ष ॲड. गणेश करांडे, सचिव संगमेश्वर आंधळकर, राजेश शिंदे, रुद्रा शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत डेमू मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डेमू रेल्वेचे उद्घाटन केले जात असल्याचा जाहीर निषेध केला होता. तसेच नगर आष्टी रेल्वे शटल सेवा पांढरा हत्ती ठरणार असून थोड्याच दिवसात नुकसानीची आकडेवारी मांडून ही शटल सेवा बंद करण्यात येईल तोपर्यंत राजकारणी आपली पोळी भाजून घेतील अशी प्रतिक्रिया विद्यार्थी युवा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष जयप्रकाश आघाव यांनी दिली होती. आता हीच बाब सत्यात उतरत असल्याचं पाहायला मिळू लागला आहे.

नगर आष्टी शटल रेल्वे सेवा सुरू होऊन आठ दिवसाचा कालावधी होत नाही तोच रेल्वेच्या जमा खर्चाची धक्कादायक आकडेवारी उघडकीस आली आहे. सातशे प्रवासी क्षमता असलेल्या या रेल्वेतून दररोज तीन ते चार प्रवासीच प्रवास करत असल्याचं उघडकिस आल आहे. नगरचे जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास भाई मुळे यांनी मराठवाड्याची भाग्यविधाती व बड्या नेत्यांचे बडे स्वप्न अशा जाहिराती आष्टी नगर या रेल्वेच्या होत्या.आष्टी-नगर डेमु रेल्वे विद्वान रेल्वे मंत्रालयाने 23 सप्टेंबरला सुरू केली आहे, तिचे आर्थिक गणित सर्वांचेच डोळे पांढरे करणारे असल्याचं म्हटलं आहे. नगर रेल्वे स्टेशनचे तिकीट बुकिंग सुप्रिटेंडन्ट उमेश यांना भेटून मागील चार दिवसामध्ये नगर-आष्टी व आष्टी- नगर रेल्वेची किती तिकिटे विकली गेली, याची माहिती मिळवली असता धक्कादायक गोष्ट समोर आली व ती म्हणजे मागील सातही दिवस आष्टी-नगर व नगर- आष्टी मिळून रोज तीन किंवा चार तिकिटांपेक्षा जास्त तिकिटे खपलेली नाहीत. या 700 प्रवासी क्षमता असलेल्या गाडीने रोज फक्त तीन किंवा चार लोकांनी प्रवास केला आहे. नगर- आष्टी चे तिकीट 40 रुपये असून रेल्वेला त्यातून दररोज फक्त 160 रुपये व मागील सात दिवसांत अंदाजे 1 हजार 200 रुपये उत्पन्न मिळाले आहेत, असा दावा त्यांनी केला.

Previous Post

“संजय राऊतांना तुरुंगात नवाब मलिकांनी काय सांगितलं असेल..”, गुलाबराव पाटलांचा खोचक टोला!

Next Post

पुणे: सम्यक साहित्य परिषदेचा ३० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा; सम्यक साहित्य परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
पुणे: सम्यक साहित्य परिषदेचा ३० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा; सम्यक साहित्य परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन.

पुणे: सम्यक साहित्य परिषदेचा ३० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा; सम्यक साहित्य परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In