अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- भालेराव हायस्कूल सावनेर येथील विद्यार्थ्यांनी दहावी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करून आपली यशस्वी परंपरा कायम ठेवली. नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी बोर्डाच्या परीक्षेत विद्यालयाचा निकाल ९३.३०% लागला.
यात कु. रागिनी ज्ञानेश्वर सहारे हिने ९३% गुण प्राप्त करून विद्यालयातून प्रथम येण्याच्या क्रमांक पटकाविला. कु. अमृता नागतोडे हिने ८९.२० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला कु.कशिश नरेंद्र चौधरी हिने ८७.२०% टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळविला.
विद्यालयातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह सावजी, संस्थेचे सचिव अँड. जयंत खेडकर तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.भारती लोणकर, उपमुख्यध्यापक ज्ञानेश्वर जाधव, पर्यवेक्षक कु.सुषमा पर्वते, शिक्षक गणेश महाजन, महेश देशमुख, प्रीती डोईफोडे, सुनिता जुनघरे, पद्मा बाली, अमोल सुके, प्रतिभा वडस्कर, दिनेश बोबडे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

