पावसाच्या सरींना न जुमानता, हिंगणघाटमध्ये ‘भारत शौर्य तिरंगा यात्रेला काल बुधवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आमदार समीर कुणावार यांच्या नेतृत्वात राष्ट्रभक्तीचा भव्य जागर करीत शहीदांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मधील ऐतिहासिक यशाचा सन्मान आणि वीर जवानांच्या अतुलनीय शौर्याचा गौरव करण्यासाठी हिंगणघाट शहरात आमदार समीर कुणावार यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत शौर्य तिरंगा यात्रेचे काल सायंकाळी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून भव्य आयोजन करण्यात आले. या दरम्यान कोसळणाऱ्या रिमझिम पावसाकडे दुर्लक्ष करून हजारो नागरिकांनी तिरंगा हाती घेत देशभक्तीने भारावलेला सहभाग नोंदवला.
स्थानिक कॉटन मार्केट येथून सुरू झालेल्या या भव्य तिरंगा यात्रेने संपूर्ण शहरात राष्ट्रप्रेमाचा उत्साह निर्माण केला. रस्तोरस्ती देशभक्तीच्या घोषणांनी गगन दणाणले, आणि वीर सैनिकांच्या पराक्रमाला सामूहिक मानवंदना देण्यात आली. या यात्रेचा समारोप कारंजा चौकात एका सन्मान समारंभाने झाला. या समारोप सोहळ्यात हिंगणघाट येथील भारतीय सैन्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांचा आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या भावनिक आणि गौरवपूर्ण क्षणी संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणाने उल्हासित दिसून येत होता.
सून ले बेटा पाकिस्तान बाप है तेरा हिंदुस्तान, वंदे मातरमच्या जयघोषात तिरंगा रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले. आणि स्थानिक जयस्तंभ चौकात तिरंगा रॅलीचे भव्य समापन करण्यात आले, यात महिलांचा मोठा सहभाग होता, अवकाळी पावसाचे आगमन झाले तरीही हजारोच्या संख्येने महिला, युवा व नागरीक स्थानिक कॉटन मार्केट येथून निघालेल्या तिरंगा यात्रेत सहभागी झाले. तिरंगा यात्रा स्थानिक जयस्तंभ चौक येथे पोचल्यावर आमदार समीर कुणावार यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित नागरिकांना समारोपीय कार्यक्रमात संबोधित केले.

