प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर या उपक्रमाच्या माध्यमातून आमदार आपल्या दारी हा उपक्रम हिंगणघाट तालुक्यातील आर्वी (छोटी) येथे राबविण्यात आला यावेळी विधानसभा मतदार संघाचे आमदार बकाने यांनी या शिबिराचे उद्घाटन केले.
यावेळी आमदार बकाने यांच्या हस्ते नागरिकांना प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली. रहिवाशी, उत्पन्न, जात प्रमाणपत्रे वाटप करून सुरू झालेल्या या शिबिरामध्ये शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित अनेक तक्रारींचे व प्रश्नांचे स्थळीच समाधान करण्यात येते. PM किसान योजना, संजय गांधी निराधार योजना, रेशन कार्ड , KYC तपासणी, प्रलंबित फेरफार नोंदी, सातबारा उतारे यासारख्या विविध विषयांवर तात्काळ निर्णय घेऊन कामे मार्गी लागतात हा आतापर्यंतचा अनुभव आहे.
या अभियानातून शासनाचे सर्व विभाग अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. असे आमदार बकाने यांनी म्हटले, याप्रसंगी उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे, नायब तहसीलदार सागर कांबळे, नायब तहसीलदार भलावी, विस्तार अधिकारी दीपक चौधरी, भुमि अभिलेखचे तांबे, महावितरण, पोलीस विभाग,वन विभाग, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी तसेच भाजपा मंडळ अध्यक्ष निलेश किटकुले, वामनराव खोडे, नारायणराव खोडे, योगेश खोडे, हनुमान बांदरे, देवा कापसे, बंडू गमे, सुनिता लिचडे, सुवर्णा महल्ले तथा पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

