अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- काँग्रेस कमिटीच्या वतीने भुकूम तालुका मुळशी जिल्हा पुणे येथील वैष्णवी शशांक हगवणे आत्महत्या प्रकरणात दोषींवर कठोर कार्यवाही करणे बाबत माननीय मुख्यमंत्री साहेब यांना माननीय उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांचेमार्फत निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्रात हुंडाबंदीचा कायदा लागू असूनही एका सुशिक्षित व उच्चभ्रू परिवारात अशी घटना घडणे हेच या राज्याच्या गौरवशाली इतिहासाला काळीमा फासणारी गोष्ट आहे. विशेष म्हणजे या छळ करणाऱ्या कुटुंबातील काही व्यक्ती राजकीय पक्षाशी संबंधित सुद्धा आहे असे निवेदनात नमूद केले होते.
या प्रकरणातील दोषींवर त्वरित कारवाई करावी जेणेकरून पुढील काळात आपल्या पुरोगामी राज्यात अशा घटना घडणार नाही तसेच पीडितेच्या लहान बाळास व माहेर कडील कुटुंबास शासनाकडून सुरक्षा प्रदान करण्यात यावी व या प्रकरणातील दोषींवर कोणतीही दया न दाखवता या प्रकरणाची त्वरित सखोल, स्वतंत्र व पारदर्शक चौकशी व्हावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
याप्रसंगी सौ. रागिणी शेंडे, उपाध्यक्ष वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी, नरेंद्र चाफले, जिल्हाधक्ष, सोशल मीडिया विभाग, वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी, सुजाता जीवनकर, सचिव अनु. विभाग, वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी, प्रतीभा हिवंज, मनिषा बदखल, वैशाली वनकर, रेणुका मोरे, मंदाकीनी ढाले, सुनिता तळवेकर, लता सुकळकर, सुरेश गोहने, कुंदनजी सुकळकर इत्यादींची उपस्थिती होती.

