रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतुर:- येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेनेचे जुने संस्थापक शिवसैनिक होते बाबू अण्णा कोयते यांच्या वयाच्या ७० व्या वर्षी दीर्घ आजाराने दिनांक २६ मे रोजी दुखद निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली एक मुलगा भाऊ भावजया नातवंडे असा मोठा परिवार आहे.
दरम्यान सायंकाळी आठ वाजता त्यांचावर स्मशानभूमी परतुर येथे अंत्यसंस्कार करण्यात आला. होलाणी दाल मिल परिसर मोंढा विभागात त्यांच्या राहत्या घरापासून त्यांची अंत्यविधी निघाली असता यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक सामाजिक कार्यकर्ते विविध राजकीय नेत्यांची व त्यांच्या नातेवाईकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

