पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन नागपूर:- दिनांक 26 मे 2025 रोजी दुपारी 12.00 वाजता आजाद समाज पार्टी (कांशीराम) जिल्हा नागपूर तर्फे निवासी जिल्हाधिकारी अनुप खांडे नागपूर यांना महाराष्ट्र राज्य प्रभारी रुपेश बागेश्वर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. यावेळी पक्षाचे राज्य महासचिव- डॉ. जे. बी. रामटेके, विदर्भ अध्यक्ष नितीन नागदेवते , विदर्भ उपाध्यक्ष अशोक वाघमारे, जिल्ह्याचे अध्यक्ष संदीप मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष नागसेन बडगे ,जिल्हा प्रवक्ता एड. प्रदीप सोमकुवर, जिल्हा महासचिव भूषण सोमकुवर,हिंगणा विधानसभा अध्यक्ष प्रदीप डोंगरे, पश्चिम विधानसभा अध्यक्ष चेतन मेश्राम ,उत्तर विधानसभा महासचिव -श्री सचिन मेश्राम इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर निवेदनाबाबत पत्रकाराची संवाद साधताना असे निदर्शनास आणून देण्यात आले की राज्य शासन सध्या जनतेच्या बेसिक समस्येबाबत दुर्लक्ष करीत असून उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करीत आहे. एन.ए., टी.पी. नसलेले लेआउट व प्लॉटची यापूर्वी रजिस्ट्री होत होती मात्र सध्या अशा लेआउट व प्लॉटची विक्री /रजिस्ट्री पूर्णतः शासनाने बंद केलेली असून संबंधित कार्यालयाचे अधिकारी याबाबत उडवाउडवीची उत्तरे देत आहेत .त्यामुळे सामान्य ग्राहक हा भरडला जात आहे.यातून शासनाने त्वरित मार्ग काढून विक्री/ रजिस्ट्रीची कार्यवाही सुरू करावी अन्यथा आजाद समाज पार्टी जना आंदोलन उभारेल असे पत्रकारांना सांगण्यात आले.

