श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड अंबाजोगाई:— बस स्थानकावर सकाळी भीषण अपघात घडला. दुसऱ्या बसमध्ये चढत असताना बाजूला उभ्या असलेल्या एका बस ने प्रवाशाला चिरडले आहे. या अपघातात प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. अंकुश मोरे असे मृत प्रवाशाचे नाव आहे.दुसऱ्या बस मध्ये चढताना बाजूने आलेल्या बसने प्रवाशाला चिरडले आहे .यात प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे.ही दुर्घटना बस स्थानकाच्या आवारात सकाळी घडली.
अंकुश मोरे हे दुसऱ्या बस मध्ये चढत असताना शेजारी उभ्या असलेली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस प्रवाशाच्या अंगावरून गेली. या अपघातात अंकुश मोरे या प्रवासाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकारामुळे काही काळ बस स्थानकावर मोठी खळबळ उडाली होती. चालकाच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशाचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे

