मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट,दि.०१ जून:- पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती दि.३१ मे रोजी साजरी करण्यात आली. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म ३१ मे, १७२५ रोजी महाराष्ट्रात झाला. या भारतातील, माळव्याच्या ‘तत्त्वज्ञानी माहाराणी’ म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नर्मदा तीरी, इंदूरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केलेल होते. त्या आधाराने अहिल्याबाईंनी इ.स. १७६६ ते इ.स. १७९५, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले होते.
यावेळी आमदार समिर कुणावार यांचे स्थानिक जनसंपर्क कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी भाजपा नेते किशोर दिघे, अतुल नंदागवळी, नलिनी सयाम तसेच आमदार कुणावार यांचे कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

