अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर ३० मे:- सावनेर तहसील परिसरातील जलतारा स्वयंसेवकांनी कोरडे क्षेत्र घोषित गावातील जलस्तर वाढविण्यासाठी दत्तक घेतलेल्या गावापैकी जैतपूर या गावी बुधवार दि २८ पासून जलतारा अभियानांतर्गत खड्डे खोदण्यासाठी सुरुवात केली. सकाळी ८.३० वाजता पासून सर्व जलतारा स्वयंसेवक आणि शेतकरी, गावातली मंडळी यांनी गुरुपूजा करून भूमिपूजन केले.
यावेळी जलतारा अभियानाचा पहिला गड्डा करून घेणारे जैतपूर गावचे शेतकरी मारोती सातपुते यांना मिठाई भरवून त्यांचा सत्कार केला. यावेळी गावकऱ्यांनी जलतारा स्वयंसेवकांचे छान स्वागत करत त्यांना पुर्ण सहकार्य करण्याचे आश्वासीत करत जलतारा स्वंयसेवकांचे आभारव्यक्त केले की तुमच्या प्रयत्नाने आणि ईश्वशक्तीने गावातील पाण्याची समस्या सुटेल आणि गावकऱ्यांच्या, शेतकऱ्यांचे पाण्याचे फार मोठे संकट दूर होइल अशी भावना व्यक्त केली.
जलतारा अभियानाच्या उद्घाटन पर सोहळ्यास स्वयंसेवक मदन डाहाके, भूषण कुबडे, भाऊसाहेब गोतमारे, अभिषेक गहरवार, वत्सल बांगरे, महेश टेकाडे, किशोर जुमडे, भुणेश्वर बोबडे, मारोती सातपुते, लीलाधर सातपुते, शुभम सातपुते, नवल अलघरे, विशाल खोंडे आणि जैतपूर गावातील ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती. प्रथमच तालुक्यातील दुष्काळग्रस्त जैतपुर गावाला पाणीदार करण्याचा संकल्प घेऊण तालुक्यातील जलतारा स्वयंसेवी प्रयत्नशील आहेत.

