पूज्य श्री अरुणप्रभाजी म.सा. यांच्या पावन सान्निध्यात, माजी राज्यसभा सदस्य अजय संचेती आणि मान्यवरांच्या हस्ते झाले भव्य उद्घाटन.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट: हिंगणघाट येथील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघातर्फे नवनिर्मित जैन स्थानक भवनाचा भव्य उद्घाटन सोहळा ८ जून रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. श्रमण संघीय उपप्रवर्तिनी, वर्धमान आयंबिल तपाराधिका पूज्य श्री अरुणप्रभाजी म.सा., गुरुकीर्तिजी म.सा., गुरुनिधिजी म.सा. आणि अरुणकीर्तिजी म.सा. आदि ठाणा ४ यांच्या पावन सान्निध्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी साध्वी अरुणप्रभाजी म.सा. यांनी “कर्तव्य हेच माझे सौंदर्य आहे” (ड्यूटी इज माय ब्यूटी) असा संदेश दिला. त्या म्हणाल्या की, प्रत्येक क्षेत्रात कर्तव्य बजावणे महत्त्वाचे आहे – मग ते कुटुंब असो, साधू-संत असोत, संघ असो किंवा समाज असो. नवनिर्मित स्थानक भवनाची देखभाल केवळ पदाधिकाऱ्यांचीच नव्हे, तर प्रत्येक श्रावकाचे कर्तव्य आहे की त्याने स्थानकाची काळजी घ्यावी. कारण स्थानक हे तुटलेल्याला अखंड करण्याची कसोटी आहे आणि ते जनसामान्याला जैन बनवण्याचा, तसेच जैनाला जिन बनवण्याचा मार्ग प्रशस्त करते.
नागपूरचे माजी राज्यसभा सदस्य अजय संचेती यांनी नूतन स्थानक भवनाचे उद्घाटन केले. हे भवन धार्मिक गतिविधींबरोबरच नैतिक मूल्ये आणि संस्कारांना प्रोत्साहन देईल, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश कमलकिशोर तातेड यांनी भूषवले. त्यांनी आपल्या संबोधनात जैन धर्माची तत्त्वे आणि त्यांचे सामाजिक महत्त्व यावर प्रकाश टाकला. हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांनी जैन समाजाचे अभिनंदन केले आणि हे भवन आध्यात्मिक व सामाजिक विकासासाठी उपयुक्त ठरेल असे नमूद केले. याप्रसंगी वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनुराग जैन, श्री जैन श्वेतांबर पार्श्वनाथ मंदिराचे अध्यक्ष ॲड. सुधीर कोठारी आणि उद्योगपती प्रतीक सरावगी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संघाचे अध्यक्ष भागचंद ओस्तवाल यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात उपस्थित सर्वांचे स्वागत केले आणि भवन निर्मितीमागील उद्दिष्टांवर प्रकाश टाकला. ओस्तवाल यांनी सांगितले की, राजस्थानी स्थापत्यकलेवर आधारित हे भवन धार्मिक शिक्षण, युवक आणि महिलांसाठी धार्मिक शिबिरे तसेच सामाजिक उन्नतीसाठीच्या इतर गतिविधींचे केंद्र बनेल. कार्यक्रमाचे संचालन हरीष कासवा यांनी केले.
या भव्य उद्घाटन सोहळ्याला मुंबई, नागपूर, पारशिवनी, वरोरा, चंद्रपूर, माढेली, खैरी, पोहणा, राळेगाव, वणी, यवतमाळ, भद्रावती, धामणगाव, बेला, कळंब यासह अनेक गावांतील जैन समाजाचे पदाधिकारी आणि विश्वस्त विशेषत्वाने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष भागचंद ओस्तवाल, मंत्री हरीष कासवा, उपाध्यक्ष सुभाष ललवानी, विजय कासवा, कोषाध्यक्ष कमलकिशोर रांका, सदस्य राजेंद्र मुनोत, रितेश ओस्तवाल, शेखर चोरडिया, विजय मुथा, ऋृषभ सिंघवी, राजेंद्र सिंघवी, कीर्ती सुराणा आणि संरक्षक चेनकरण कोचर, खुशालचंद चोरडिया, पुखराज रांका यांनी अथक प्रयत्न केले. उद्घाटन समारंभात शहरातील श्रावक-श्राविका आणि विविध समाजांचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यामुळे कार्यक्रमाची भव्यता वाढली. ही माहिती राजेश अ. कोचर यांनी दिली.
