सौ. हनिषा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनीधी मो.9764268694
बल्लारपूर : वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर शहर चे प्रतिनिधी आज दिनांक 2 जून ला दुपारी 12.30 वाजता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय अधिकाऱ्यांची धडक भेट घेतली. संतोषी माता वार्ड येथील कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून त्या वार्डात प्राधिकरणाच्या नळाला अत्यंत दुषित व घाण पाणी येत असल्याची माहिती मिळालेली आहे त्या संदर्भात चर्चा करण्याकरिता व 24 तास पाणी पुरवठा व्हावा त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे ध्यानाकर्षण करण्याकरिता वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी धडक भेट दिली आहे . आणि अभियंता गजानन बारापात्रे यांच्याशी चर्चा केली. यावेळी उमेश कडू शहर अध्यक्ष वंचीत बहुजन आघाडी,
रेखा पागडे महिला शहर अध्यक्ष, बल्लारपूर वंचीत बहुजन आघाडी प्रज्ञा नमनकर, सविता नाईक, सविता थुलकर, सुरेखा भगत, विमल निरंजने, चौहाण ताई, स्वती लोंढे, जवादे ताई, सुजाता जवादे, शिल्पा चौहान उपस्थित होते

