मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक २ जून २०२५ रोज सोमवारला हिंगणघाट पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांना शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने उपजिल्हा प्रमुख सतीश धोबे, नगर सेवक मनीष देवडे, माजी उपजिल्हा प्रमुख शंकर झाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील विविध समस्या संदर्भात निवेदन देण्यात आले.
निवेदनाच्या माध्यमातून सांगण्यात आले कि शहरात मोठया प्रमाणावर दारूची विविध चौकात विक्री, MD (आमली पदार्थ) ची विविध सेंटर मध्ये विक्री, शहरातील महत्त्वाच्या जागेवर सट्टा व्यवसाय कोणाच्या हि दबाव नसल्यामुळे सुरू आहे. शहरात अवैध रित्या वाळू चोरी बिना रोक टोक ने वाहतूक सुरू असतांना महसूल अधिकारी कार्यवाही करतांना दिसून येत नाही त्यांना सरकार चे महसूल बुडत असल्याचे लक्षात येऊन सुध्दा डोळे मिटून पहात आहे.
आपण समजू शकतो कि सत्ताधारी पक्षाच्या नेत्या कडून या अधिकाऱ्यांवर दबाव असू शकतो. परंतु शहरात अवैध रित्या दारू, गांजा, MD, सट्टा खुलेआम चालू आहे तरी या संदर्भात पोलीस प्रशासन कार्यवाही करताना का दिसत नाही. आज शहरातील विविध चौकात, गळीत बोळ्यात अवैध धंदे सुरू आहे. यांच्यावर कार्यवाही न करण्यासाठी कोणाचा दबाव तर नाही ना ! असा प्रश्न आम्हाला आणि जनतेला पडला आहे. या अवैध धंदे करणाऱ्या मंडळी मोठया किमितीच्या गाड्या घेऊन राजकीय धडे देण्याचे काम या शहराच्या नवीन पिडीला देत आहे.
त्याच प्रमाणे आमच्या पाहण्यात आणि प्रिंट मीडिया च्या माध्यमातून वाचण्यात आले होते कि शहरात रात्रीच्या वेळी चोरी झाली, दुकाने फोडली परंतु आता तर दिवसाढवळ्या लोकांचे घर फोडून चोरी करण्याची हिम्मत या चोरट्यांनी झाली आहे. या लोकांना कोणाचा धाक राहिला नाही. सत्ताधारी नेत्याला असल्या महत्त्वपूर्ण विषयावर वरिष्ठ पातळीवर पोलीस अधिकाऱ्या सोबत चर्चा करून बंदोबस्त करण्यासाठी पाहुल उचलायला पाहिजे होते परंतु ते घरी चूप बसून झालेल्या घटनेवर संतावना देण्यास पुढे राहतात.
शिवसेनेला आणि जनतेला पोलीस प्रशासनावर विश्वास आहे कि सामान्य माणसाच्या सुरक्षेसाठी पोलीस विभाग कोणाच्याही दबावात न येता योग्य पाहुल उचलून अवैध रित्या चालू असलेल्या धंद्यावर कार्यवाही करून जनतेत विश्वास प्रस्थापित करेल. जर पोलीस प्रशासन असल्या लोकांवर योग्य पाहुल उचलण्यात कानाडोळा केले तर शिवसेना (उबाठा) पक्षाकडून पोलीस प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात तयार राहील. शेवटी जनतेच्या सुरक्षेसाठी शिवसेना नेहमी तयार आहे.
निवेदन देतांना शिवसेनेचे पदाधिकारी गजानन काटवले, सुनील आष्टीकर, नंदू रेडलावार, नरेंद्र गुडकरी, सतीश मसराम, अनिल कडू, शितल चौधरी, भास्कर ठवरे, दिलीप चौधरी, प्रशांत कांबळे, नितीन वैद्य, जयकुमार रोहनकर, पप्पू घवघवे, शेख वसीम, शकील अहमद, अतिक मिर्जा, बलराज डेकाटे, शेख नाहीम, अमोल वादाफळे, विजय कोरडे, हिरामण आवारी, राजू मंडलवार, भास्कर भिसे, आकाश सुरकार, श्रीकृष्ण रामगडे इत्यादी उपस्थित होते.

