माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट ०२ जून:- मागील १५ दिवसापासुन सुरू असलेल्य पावसामुळे उन्हाळी पिकाचे नुकसान झाले असुन शेतक-याच्या शेताचा सरकार तर्फे सर्व्हे करून नुकसान भरपाई देण्याबाबत माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपविभाग अधिकारी मार्फत निवेदना द्वारे मागणी करण्यात आली.
मागील १५ दिवसापासुन सुरू असलेल्या पावसामुळे शेतक-याच्या शेतातील ज्वारी, उन्हाळी मुंग, तिळ, भाजीपाला, भुई मुंग, मका, कांदा इत्यादि पिके कुजण्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे शेतातील उन्हाळी पिके सडली असुन दुर्गंध सुटला आहे. भईमुंग, मका, ज्वारी, तिळ इत्यादी पिकातून कोंब बाहेर निघाले आहे.
ज्वारीच्या पडलेल्या पिकात कनसे सडली असुन ओला कडबा कुजलेला आहे. त्यामुळे जनावरांच्या चा-याचा प्रश्न शेतक-यासमोर उभा झाला आहे .
तरी शेतक-यांच्या शेतातील पिकाचे झालेल्या नुकसानीचा सरकारतर्फे सर्व्हे करून नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीचे निवेदन माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले.

