पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- पीपल्स रिपब्लिकन पार्टी नागपूर शहराच्या मुख्य कार्यालयात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवडे आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आणि लघु उद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्यमंत्री दर्जा जयदीप जोगेंद्र कवाडे यांच्या उपस्थितीत शेख नजीर शेख रिजवान यांची नागपूर शहर उपाध्यक्षपदी तर अंकित राजेश धुपे यांची विदर्भ संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पीपल्स रिपब्लिकन पार्टीला बळकटी देऊन आणि संघटनेच्या प्रत्येक कार्यक्रमात आणि चळवळीत सहभागी होऊन तुम्ही पक्षाप्रती असलेले तुमचे कर्तव्य पार पाडाल अशी पक्षाला पूर्ण आशा आहे. तुम्ही पीपल्स रिपब्लिकन पार्टी, संघटना आणि पक्षाशी संबंधित आंबेडकरी विचारसरणी आत्मसात करून काम करत राहाल. असे पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष, राज्यमंत्री दर्जा जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी सांगितले.
यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, पक्षाने दिलेल्या आदेशांचे पालन करण्यास आम्ही नेहमीच तयार राहील. भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी आणि एकतेसाठी आम्ही सर्व मिळून काम करणार. अशी प्रतिज्ञा घेऊन पक्षाला बळकटी देईन. असे यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित असलेल्या ताज गॅलेक्सी हॉटेलच्या मित्र परिवाराने शुभेच्छा दिल्या आहेत.

