हिंगणघाट येथे अवैध धंदे करणारे संरक्षित, आम जनता असुरक्षित.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट :- शहरात कायदा आणि सुव्यवस्था वर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून चोऱ्या, अमली पदार्थ( MD) च्या वाढत्या घटने मुळे आम नागरिकात भिती चे वातावरण निर्माण झाले आहेत. यात खाली पिली रिकाम चोट पासी लाख रुपयेचे मोबाईल, महागाडी टु व्हीलर काही दिवसांनंतर फोर व्हीलर गाडीत पेट्रोल टाकायला रुपये कुठून येत आहे. हिंगणघाट पोलिसांनी या रिकाम्याची कधीं माहिती घेतलीं आहे कायॽ हे रिकाम चोट रात्री दोन दोन वाजता फिरतात लोकांच्या घरा समोर घानेरड्या शिव्या देतात. ज्यामुळे हिगणघाट पोलिसांना याच कांहीं देणघेण नाही. नागरिकात असेस भितीचे वातावरण कधी पर्यत राहणारॽ
गेल्या काही महिन्यांपासून येथे गुन्हेगारी च्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ३१ मे रोजी एकाच दिवशी दिवसाढवळ्या ०४ घरा मध्ये चोरी झाली. दिनांक ५ जून ला मोहता बगीच्या येथील संत तुकडोजी वार्डात दुपारी सहा घरफोड्या झाल्या आहे. हिंगणघाट हे तहसील वाईट गोल्ड होता. आता अवैध धंदेचा गोल्ड बनत आहेॽ हिंगणघाट आता दारू, सट्टा, ऑनलाइन सट्टा (खटखट) क्रिकेट सट्टा आणि अंमली पदार्थ चा माहेरघर बनत आहे.
शहरातील अनेक भागात अमली पदार्थ चे ठिकाण बनले आहे. शहरातील नागरिकात भीती वाढत आहे की, आमचे शिक्षण घेणार्या मुलांना हिंगणघाट ला शिक्षण द्यायचे की नाहीॽ अशी बिकट परिस्थिती शहराची होत असताना पोलीस प्रशासनाची उदासीनता मात्र वर दिसून येत आहे.

