Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

विविध सामाजिक संस्थांनी मांडल्या राजुरा शहर व परिसरातील नागरिकांच्या ज्वलंत समस्यांची व्यथा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
June 12, 2025
in आंदोलन, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
विविध सामाजिक संस्थांनी मांडल्या राजुरा शहर व परिसरातील नागरिकांच्या ज्वलंत समस्यांची व्यथा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

एकोणतीस सामाजिक संघटना एकवटल्या. तात्काळ उपाययोजना करण्याची केली मागणी.

संतोष मेश्राम, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा ११ जुन:- राजुरा शहर व परिसरातील नागरिक काही दिवसांपासून अनेक समस्यांना तोंड देत आहे. सध्या महामार्गाचे काम नियोजनशून्य पद्धतीने सुरु असल्याने व वर्धा नदीजवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूला मातीच्या ढिगाऱ्यामुळे पावसात रस्त्यावर चिखल साचत असून व धुळीचे साम्राज्य पसरत असल्याने निष्पाप नागरिकांना आपले जीव अपघातात गमवावे लागत आहे.

नगरपरिषदेची जाचक करवाढ, शहरातील वाढती गुन्हेगारी , चोरीचे प्रमाण व निकृष्ट दर्जाचे संत गतीने सुरू असलेले गट्टू लावण्याचे कामामुळे उद्भवलेली पार्किंगची समस्या, अनियंत्रित जड वाहनाची वाहतूक, पंचायत समिती चौकात वाहतूक सिग्नल व्यवस्था बंद आहे, वर्दळीच्या ठिकाणी पुरेशी पार्कींग व्यवस्था नसल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे, शहरातील मुख्य मार्गावर पथदिव्यांची व्यवस्था नाही अशा विविध समस्यांचे निवेदन तयार करून जवळपास एकोणतीस सामाजिक संघटना एकत्रित येऊन या ज्वलंत समस्यावर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

हे निवेदन खासदार प्रतिभा धानोरकर चंद्रपूर, आमदार देवराव भोंगळे राजुरा, रवींद्र माने उपविभागीय अधिकारी राजुरा, डॉ. ओमप्रकाश गोंड, तहसीलदार राजुरा, पोलिस निरीक्षक, पोलिस स्टेशन राजुरा, मुख्याधिकारी, नगर परिषद राजुरा यांना निवेदनाद्वारे समस्या निकाली काढण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी रोटरी क्लब, जेसीआय राजुरा क्लब डायमंड सिटी, व्यापारी असोसिएशन, रामबाग विकास समिती, धनोजे कुणबी समाज, राजपूत क्षेत्रीय समाज, तैलिक समाज संघटना, सुतार समाज संघटना, आर्य वैश्य कोमटी समाज मंडळ, राजस्थानी समाज मंडळ, पत्रकार संघ, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, जामा मस्जिद वक्त कमिटी, ब्राह्मण समाज मंडळ, खैरे कुणबी समाज मंडळ , बार असोसिएशन, नाभिक समाज मंडळ, मॉर्निंग वॉक ग्रुप, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य, भारतीय बौद्ध महासभा, गुरुदेव सेवा मंडळ, मेडिकल असोसिएशन राजुरा, ख्वाजा सिया मुस्लिम समाज बांधव, फ्रेंड्स स्पोर्ट क्लब, माजी विद्यार्थी संघ, तेली समाज युवक मंडळ, जिवनदिप पर्यावरण संस्था, बहुजन हिताय ऑटो चालक कामगार संघटना आदी सामाजिक संघटनांचा समावेश होता.

रविंद्र माने, उपविभागीय अधिकारी राजुरा
विवीध समस्यांच्या अनुषंगाने आलेल्या शिष्टमंडळाशी उपविभागीय अधिकारी यांनी सकारात्मक चर्चा केली. लवकरच पोलिस प्रशासन, नगर परिषद प्रशासन, महामार्ग प्रशासन व निवेदनाच्या अनुषंगाने आवश्यक आसलेल्या यंत्रणेची संयुक्त बैठक घेऊन त्यावर योग्य ती उपाययोजना करण्यात येईल असे यावेळी रविंद्र माने उपविभागीय अधिकारी म्हणाले.

विवीध सामाजिक संघटना एकत्रित येऊन सर्व सामान्य माणसाच्या अडीअडचणी, समस्या निकाली काढण्यासाठीचा हा प्रयत्न सर्वत्र चर्चेत आहे. विचारसरणी, कार्यपद्धती वेगवेगळी असली तरीही सर्वसामान्य नागरीकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी या सर्व एकोणतीस सामजीक संस्था – संघटना एकत्रित आल्याने शासन – प्रशासनाला ही तात्काळ उपाययोजना कराव्या लागतील अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

Tags: Rajura news
Previous Post

हिंगणघाट शहरात भर दिवसात होत आहे घर फोडी, कायदा व सुव्यवस्था वर निर्माण होत आहे प्रश्नॽ

Next Post

महाराष्ट्र हादरला: सांगलीत 18 दिवसा अगोदर लग्न झालेल्या बायकोने कुऱ्हाडने डोक्यात वार करत केली पतीची हत्या.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
महाराष्ट्र हादरला: सांगलीत 18 दिवसा अगोदर लग्न झालेल्या बायकोने कुऱ्हाडने डोक्यात वार करत केली पतीची हत्या.

महाराष्ट्र हादरला: सांगलीत 18 दिवसा अगोदर लग्न झालेल्या बायकोने कुऱ्हाडने डोक्यात वार करत केली पतीची हत्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In