वनहक्क समितीचे अध्यक्ष रंगा वेलादी यांनी रेपणपल्ली येथील वनपरीक्षेत्र अधिकारी यांना निवेदन.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
*अहेरी*= वनपरिक्षेत्र अधिकारी रेपनपल्ली यांना दिलेल्या निवेदनात ग्रामपंचायत देवलमरी अंतर्गत कोलपल्ली वासीयांनी वन हक्काच्या पट्ट्यासह चालू वर्षात वन जमिनीची मशागत करून शेती करू देण्याची मागणी केली आहे.
2005 पूर्वीपासून वन हक्क जमिनीची सदर शेतकरी पट्ट्यासाठी वाट पाहत असून यावर्षीही शेती अवजारांना अडथळा न आणता शेती करू देण्याची विनंती निवेदनातून केली आहे.
2001 पासून कोलपल्ली वासियांनी वन हक्काच्या पट्ट्यासाठी मागणी रेटून धरली. काही शेतकऱ्यांना पट्टे मिळाले. मात्र बऱ्याच शेतकऱ्यांच्या दस्ताऐवजात त्रुटी असल्याने त्या परत आल्या होत्या. त्यानंतर 2020 मध्ये कागदपत्रांची पूर्तता करूनही निवेदन दिलेल्या 26 शेतकऱ्यांना पट्टे मिळाले नाही.
उपविभागीय अधिकारी कार्यालयात सदर दस्तऐवज पडून असल्याचे समजते त्यामुळे शेतकऱ्यांवर रोजी रोटीचा प्रश्न उद्भवू नये यासाठी निवेदनातून वनशेतीची मशागत करू देण्याची मागणी वजा विनंती केली आहे.
यावेळी वन हक्क समितीचे अध्यक्ष रंगा वेलादी, सचिव शंकर चालूरकर, दिवाकर गावडे, कोमल सडमेक, पुरुषोत्तम आईलवार, मनोज सोयाम व इतर शेतकरी उपस्थित होते.

