पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- आज शुल्लक हत्या सारख्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यात नागपूर शहरातून अशीच एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येते गुटखा न देण्यावरून झालेल्या शुल्लक वादातून दोन मित्रांनी एका 18 वर्षीय युवकावर लोखंडी रॉडने वार करत हत्या केली.
या घटनेत आरोपीने मृतक तरुणावर लोखंडी रॉडने वार केला त्यात तो तरुण गंभीर जखमी झाला त्यांनतर त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. पण तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. ही घटना नागपूरच्या अजनी पोलीस स्टेशन हद्दीत घडली. मृताच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून आरोपींना अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. आर्यन विलास वहिले वय 18 वर्ष असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मृतक आर्यनला ड्रग्जचे व्यसन होते आणि कोणालाही न कळवता घरातून निघून जायचा. घटनेच्या आठ दिवस आधी तो अशाच प्रकारे घरातून बेपत्ता झाला होता. दरम्यान, मंगळवारी एका व्यक्तीने आर्यन हा अजनी पोलीस ठाण्याजवळील फूटपाथवर बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे त्याच्या वडिलांना कळवले. त्यानंतर वडिलांनी त्याला घरी आणले, नारळ पाणी दिले आणि झोपवले. पण रात्री नऊ वाजताच्या सुमारास अचानक आर्यनची तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.याप्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली.

