संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- दिनांक 02 ते 12जून 2025 दरम्यान,इन्फंट जिजस पब्लिक स्कूल, राजुरा येथे वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण उत्कृष्ट रित्या पार पडले. या प्रशिक्षणात राजुरा, कोरपना, जिवती आणि गोंडपिपरी या तालुक्यांतील शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला. या 10 दिवस चालणाऱ्या प्रशिक्षणाचा उद्देश शिक्षकांना नव्या शैक्षणिक धोरणानुसार आवश्यक कौशल्ये, मूल्यांकन प्रणाली आणि वेतन श्रेणीसंबंधी प्रक्रिया, विविध कायदे याबाबत सखोल मार्गदर्शन देणे हा होता.
सदर प्रशिक्षण हे राजुरा चे गटशिक्षणाधिकारी श्रीमती मंगला तोडे यांचे मार्गदर्शनात घेण्यात आले. या प्रशिक्षण करिता, संस्थेचे अध्यक्ष श्री अभिजित धोटे,शाळेचे दोन्ही मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू,मंजुषा अलोने व श्री अजहर सिद्दीकी यांनी उत्तम सहकार्य केले. प्रशिक्षण समन्वयक /शिविअ श्री सावनकुमार चालखुरे, सहसमन्वयक, शिविअ श्री विशाल शिंपी, केंद्र प्रमुख श्री रामा पवार, श्री नारायण तेलकापल्लीवार, श्री प्रभाकर जुनघरे, सौ. किरण कामडी, आय टी समन्वयक श्री. आशिष बहादुरे व सर्व सुलभक इत्यादीनी प्रशिक्षण संचालनाचे कार्य केले. समारोपीय कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित श्रीमती मंगला तोडे मॅडम यांनी मार्गदर्शनात शैक्षणिक गुणवत्ता व राष्ट्र उभारणीसाठी मानव संसाधने सक्षम करण्याकरिता प्रशिक्षणाची आवश्यकता असते असे मत अधोरेखित केले.
यावेळी विविध प्रशिक्षणार्थी यांनी नवी उर्जा घेवून अधिक सक्षमपणे कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याचे तसेच प्रशिक्षणातून आनंद व्यक्त करत निश्चितच आपल्या विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन अध्यापनामध्ये उपयोग होईल अशा प्रतिक्रिया मनोगतातून व्यक्त केल्या.संपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम नियोजनबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडला.
सदर प्रशिक्षणाला तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून म्हणून श्री.मुसा शेख,,लिंगोराव सोयाम, श्री. राजेश बोळे, श्री काकासाहेब नागरे, कु. ज्योती गुरनुले, श्री. भीमराव कोरडे, श्री. विकास गेडाम, श्री. विनोद वाघमारे, श्री. इरफान शेख, श्री. विकास भांडारवार, श्री. कैलास मेश्राम, श्री. नरसिंग पांचाळ इत्यादीनी कार्य केले. तर प्रशिक्षण करिता सहायक म्हणून कु. गीता जांबुलवार, श्री. देवेंद्र रहांगडाले, राजकुमार भुरे, राकेश रामटेके इत्यादीनी कार्य केले.

