अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर १६ जुन:- धनोजे कुणबी समाज मंडळ सावनेर व धनोजे कुणबी युवा मंच नागपूर (ग्रामीण) यांच्यावतीने रविवार दि. १५ जुनला सकाळी १० वा. राम गणेश गडकरी सभागृह सावनेर येथे इयत्ता दहावी व बारावीतील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी तसेच धनोजे कुणबी समाजातील भारतीय सेनेतील सैनिक व पत्रकार यांचा सत्कार सोहळा तसेच करियर गायडन्स मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
1या कार्यक्रमाच्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. शंकररावजी ढोके,कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून श्री.गंगाधरराव माडेकर करियर गायडन्स मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ.संजयरावजी घुगल शिवाजी सायन्स कॉलेज पवनी व नेवजाबाई हितकारीनी महाविद्यालय ब्रह्मपुरी येथील प्राध्यापक डॉ.मुंगोले प्रामुख्याने उपस्थित होते.तसेच श्री.मनोहरराव कुंभारे, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी नागपूर (ग्रामीण), श्री.रामरावजी मोवाडे, श्री.राजूभाऊ घुगल, श्री.विनोद जीवतोडे (गुरुजी),श्री.विवेक मोवाडे,श्री.नंदलाल मोवाडे, श्री.धनंजय मुसळे, श्री.सोमेश्वरजी जोगी, श्री.मदनजी डहाके श्री.मिलिंद सातपुते, डॉ.परेश पिंगे, श्री.सचिन मोहतकर, लक्ष्मीकांतजी सातपुते,राहुल सातपुतेतसेच धनोजे कुणबी समाज मंडळ सावनेर वधनोजे कुणबी युवा मंच नागपूर (ग्रामीण) चे सर्व पदाधिकारी व गुणवंत विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

