सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनीधी मो 9764268694.
दि. 17 जून 2025 ला दुपारी 1.00 वाजता बल्लारपूर वंचित बहुजन आघाडी तथा महिला आघाडीने विविध मागण्यांचे एक संयुक्त निवेदन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाला सादर केले या निवेदनात द्वारे मागणी करण्यात आली की बल्लारपूर शहराला शुद्ध आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा करून 24 तास पाणी उपलब्ध करावे व सोबतच अन्य प्रमुख मागण्या त्यामध्ये नमूद करण्यात आल्या
1) महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला जर मीटर पद्धतीने बिल हवे असेल तर 24 तास पाणीपुरवठा करण्यात यावा
2) शुद्ध व स्वच्छ पाण्याचा सतत पाणी पुरवठा करण्यात यावा
3) पाणीपुरवठा विभागाने नवीन पाईपलाईन जोडणी केली तेव्हा जे जे मीटर बदलण्यात आले त्या सर्व मीटरची देखभाल दुरुस्ती हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने स्वीकारावी अन्यथा ग्राहकांचे जे जुने चालु मीटर काढून नेलेले आहे ते परत आणून लावण्यात यावे
4) नळ जोडणी मधील कुठलाही पाईप फुटला तथा लिकेज असल्यास त्याची देखील देखभाल दुरुस्तीची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने घ्यावी कारण नवीन जोडणी मध्ये वापरण्यात आलेले निकृष्ट दर्जाचे पाईप हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने स्वतःच्या मर्जीने लावलेले असून त्यामध्ये ग्राहकांचा हस्तक्षेप नव्हता
5) ग्राहकांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात आपल्या कर्मचाऱ्याकडून मिळणारी वागणूक सौजन्य पूर्ण करावी ग्राहक हा प्राधिकरणाचा गुलाम नाही याची तमा बाळगावी तो उपभोक्ता आहे व त्याचा सन्मान राखण्यात यावा
6) संपूर्ण शहरात 99% ग्राहकांचे मीटर चुकीच्या पद्धतीने फिट करण्यात आलेले असल्यामुळे त्या ग्राहकांना हवेचे बिल भरावे लागत आहे करिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने त्या मीटरची शास्त्रशुद्ध पद्धतीने जुल्यामध्ये फिटिंग करण्या करून हवेने मीटर कसे फिरणार नाही याची खबरदारी घ्यावी
7 ) जर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 24 तास पाणी देण्यास असमर्थ असेल तर बल्लारपूर शहरातील सर्व ग्राहकांना सरासरी बिलाचे आकारणी करण्यात यावी व मीटर सिस्टम बंद करण्यात यावे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष उमेश कडू यांच्या नेतृत्वात महिला आघाडी शहराध्यक्षा रेखाताई पागडे, सुप्रियाताई चंदनखेडे, प्रज्ञाताई नमनकर, किरणताई रामटेके, समताताई लाभाने, सविताताई थुलकर, दमयंती सातपुते, किशोर सिंधू सातपुते , योगिता भगत परवीन शेख, आशाबाई कांबळे, मंगला वाणी, रजिया शेख,शोभा दुपारे, शोभा मजगवडी शेवंताबाई सातपुते, विमल निरंजने, कुंदा माणूसमारे, कुंदा तडस, शकुंतला मुनेश्वर, शोभा बोरकर ,रंजना वैद्य, लीला बोरकर, सुंदराबाई वैद्य, रविता भैसारे, अर्चना गुरनुले, विशाखा भगत, भावना खोब्रागडे, अनिता नगराळे, संगीता ब्राह्मणे वैजयंती रामटेके ,प्रभुदाजी देवगडे, राकेश पेटकर, अशोकजी भावे,देवराम नंदेश्वर, उमेश हाडके, प्रियंकेश शिंगाडे, संतोष चिवडे ,अश्विन चंदनखेडे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते निवेदनात इशारा देण्यात आला की येत्या 7 दिवसाच्या आत मागण्या मान्य न केल्यास आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल…

