मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
*अहेरी -* येथील ग्राम पंचायतीचे माजी उपसरपंच सचिन पेदापल्लीवार यांचे मंगळवार 17 जून रोजी निधन झाले, बुधवार 18 जून रोजी शोकाकुल वातावरणात गडअहेरीच्या घाटावर अंतिम संस्कार करण्यात आले.
पत्नी माजी नगराध्यक्ष प्राजक्ता व भाऊ समीर पेदापल्लीवार यांनी भडाग्नी दिले.
यावेळी अहेरी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.कन्ना मडावी यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली.या प्रसंगी प्रा.राजेश कात्रटवार, रविंद्र वासेकर, नगर सेवक अमोल गुडेल्लीवार, अमोल मुक्कावार, सामाजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार, सुरेंद्र अलोणे, आनंद अंगुलवार, शंकर मगडीवार आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी माजी उपसरपंच सचिन पेदापल्लीवार यांच्या लोकप्रिय, मनमिळाऊ, प्रेमळ स्वभावावर आणि सामाजिक, शैक्षणिक व राजकीय जीवनावर प्रकाश टाकून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिले.
सचिन पेदापल्लीवार अहेरी येथील धर्मराव कृषी विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. अहेरी नगर पंचायत अस्तित्वात येण्याआधी अहेरी ग्राम पंचायतीचे उपसरपंचही होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, भाऊ व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
सचिन पेदापल्लीवार यांच्या निधनाने अहेरी व परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केले जात आहे. अंत्य विधीत फार मोठा जनसमुदाय सामील होते.

