पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- पॅरिस एअर शोमध्ये झालेला डसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्स एरोस्पेस लिमिटेड यांच्यातील करार हा केवळ एक औद्योगिक करार नसून, तो भारताच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने उचललेलं महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक पाऊल आहे. फाल्कन – 2000 या उच्च दर्जाच्या बिझनेस जेटची संपूर्ण निर्मिती आता महाराष्ट्रातील नागपूरमध्ये होणार आहे आणि यामुळे भारत थेट जागतिक एरोस्पेस निर्मितीच्या नकाशावर झळकणार आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कराराचं स्वागत केलं आहे.
त्यामागे त्यांची दीर्घदृष्टी आणि नागपूरच्या औद्योगिक पायाभूत सुविधा मजबूत करण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. मिहानसारख्या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर संरक्षण व एरोस्पेस उत्पादनासाठी आधारभूत सुविधा निर्माण केल्या, ज्यामुळे आज असे ऐतिहासिक करार शक्य झाले आहेत
या कराराचे ठळक वैशिष्ट्ये :✔️ फाल्कन 2000 जेटची संपूर्ण निर्मिती भारतात प्रथमच होणार.✔️ नागपूरच्या मिहानमध्ये फॅक्टरी: जागतिक दर्जाचं उत्पादन केंद्र म्हणून उभारणी.✔️ 2028 पर्यंत पहिला मेड इन इंडिया फाल्कन, हे एक माईलस्टोन ठरेल.✔️ डसॉल्ट रिलायन्स एरोस्पेस (DRAL) हे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ म्हणून विकसित होणार आहे.✔️ फाल्कन 8X आणि 6X जेटसची असेम्ब्ली सुद्धा नागपूर मध्येच होणार! नागपूर हे भविष्यात एव्हिएशन हब बनणार.✔️ हजारो अभियंते व तंत्रज्ञांना रोजगार उपलब्ध तर होईलच त्याबरोबर स्थानिक कौशल्याला प्रोत्साहन सुद्धा मिळेल.
✅ या करारामुळे भारत, फ्रान्स, अमेरिका, ब्राझीलच्या यादीत गेला.✔️ या करारामुळे भारत एव्हिएशन उत्पादक देशांच्या यादीत पोहोचणार आहे. अमेरिका, फ्रान्स, कॅनडा, ब्राझीलसारख्या देशांबरोबर आता भारताचं नावही या प्रगत विमाननिर्मितीच्या यादीत घेतलं जाईल.
✅ नरेंद्र मोदी यांनी पाहिलेला ‘मेक इन इंडिया’ साकार होत आहे:डसॉल्टसारखी कंपनी जेव्हा भारतात संपूर्ण उत्पादनासाठी पाऊल टाकते, तेव्हा हे केवळ एक व्यावसायिक निर्णय नसतो, तर भारताच्या स्थिर धोरणांवरील विश्वासाचे प्रतीक असते. ‘मेक इन इंडिया’, ‘डिफेन्स मेन्युफॅक्चरिंग’, ‘आत्मनिर्भर भारत’ या योजना आता प्रत्यक्षात यशस्वी होत आहेत.
✅ राफेल ते फाल्कन भारतातली विश्वासार्हता :डसॉल्ट हीच ती कंपनी आहे जी भारतीय वायुदलासाठी राफेलसारखं आधुनिक फायटर विमान बनवते. आता त्यांनी नागपूरला पसंती देणं म्हणजे भारतातल्या सुरक्षिततेच्या, कामाच्या गुणवत्तेच्या आणि धोरणात्मक स्थैर्याच्या प्रतिमेवर त्यांचा विश्वास दृढ झाला आहे.- प्रकाश गाडे

