मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 19 जून रोज गुरुवारला स्थानिक संत तुकडोजी वार्ड मधील गणेश नगर येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. पत्रकार परिषदेमध्ये संत तुकडोजी वार्ड, हिंगणघाट येथे गणेश नगर च्या बाजूला असलेल्या मंगल कार्यालय बांधकामाचे विरोधात परिसरातील नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात आला.
सदर मंगल कार्यालय सुरू झाल्यानंतरच्या त्रासामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व जेष्ठ नागरिकांचे आरोग्याचे नुकसान होऊ शकते असा संताप नागरिकांनी व्यक्त केला.
स्थानिक नागरिकांकडून दि. 14/2/2025 ला स्थानिक नगर परिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते, परंतु स्थानिक नगर परिषद प्रशासनाने निवेदनाकडे डोळे झाक करून सदर बांधकामाला परवानगी देण्यात आली. त्यानंतर 21 एप्रिल 2025 ला पुन्हा सदर बांधकामाच्या विरोधात निवेदन देण्यात आले व विनंती करण्यात आली, तरी पण नगर परिषदेने निवेदनावर दुर्लक्ष केले व मंगल कार्यालयाच्या बांधकामाचा वेग आणखी वाढवण्यात आला, त्यामुळे परिसरातील समस्त नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनावर दिनांक 15/6/2025 ला नगर परिषद, हिंगणघाट चे मुख्याधिकारी यांना पुनश्च सदर बांधकाम थांबवण्याची विनंती करण्यात आली व दिलेली परवानगी रद्द करून संबंधित अधिकारी यांचेवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली, अन्यथा वार्डातील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते राजेश भाईमारे यांनी ‘अन्नत्याग आंदोलनाचा’ इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. प्रशासन संबंधित विषयावर गंभीर नाही.
सदर मंगल कार्यालयाच्या बाजुलाच एक नामांकित शाळा व महाविद्यालय आहे त्यामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून पण रोष व्यक्त करण्यात येत आहे. सोबतच नजिकच्या आदर्श नगर, सुखमनी नगर, प्रगती नगर व संबोधी नगर येथील नागरिकांच्या मानसीक आरोग्याचे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते, याबाबत कोणताही विचार करत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वार्डातील नागरिकांवर गेल्या 22 वर्षांपासूनचे राहते घर विकण्याची वेळ आली आहे व काही लोकांनी आपल्या घरावर घर विकणे आहे असे फलक सुद्धा लावले आहे. म्हणून वार्डातील नागरिकांनी सदर मंगल कार्यालयाचे बांधकाम थांबवावे, असे मत पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.

