संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोरपना:- चंद्रपूर जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर येथे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते, देशाचे विरोधी पक्षनेते, खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरज गोंडे आणि मित्र परिवारांच्या संयोजनातून करण्यात आले. यात ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून कृ. उ. बा. स. सभापती अशोकराव बावणे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, माजी उपनगराध्यक्ष सचिन भोयर, गडचांदूर काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष महाडोळे, सुनील झाडे, यु. काँ. शहराध्यक्ष महादेव हेपट, विवेक येरणे, शैलेश लोखंडे, देविदास मून, विलास मडावी, प्रितम सातपुते, इंदर कश्यप, सुरेश पाचभाई अमन निजामी, श्रीनिवास पवार, यासह गडचांदूर काँग्रेस, युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक उपस्थित होते.

