संतोष मेश्राम,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल, कल्याण नर्सिंग कॉलेज आणि पतंजली योग समिती राजुरा यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी इन्फंट शाळेची विद्यार्थिनी कुमारी जीविका वैद्य तसेच पतंजली योग समितीच्या प्रशिक्षकांनी योगाचे मानवी जीवनातील महत्त्व या संदर्भात मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रशिक्षकांनी सादर केलेल्या प्रात्यक्षिक व सुचनानुसार उपस्थित मान्यवरांनी, शिक्षक व विद्यार्थी विविध आरोग्यदायी योगासनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
यावेळी संस्थेचे सचिव, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, संस्थेचे अध्यक्ष अभिजीत धोटे, उपविभागीय अधिकारी रवींद्र माने, तहसीलदार ओमप्रकाश गौंड, उपजिल्हा रुग्णालय राजुरा चे वैद्यकिंय अधिक्षक डाॅ. अशोक जाधव, पतंजली योग समितीचे अध्यक्ष प्रशिक्षक हरिभाऊ डोर्लीकर व योग समितीतील सदस्यगण, मुख्याध्यापिका मंजुषा आलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी यासह इन्फंटचे शिक्षक -शिक्षिका, कल्याण नर्सिंग कॉलेजचे प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन संतोष सागर यांनी मानले.

