मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथील जीवरक्षक फाउंडेशन रेस्क्यू सेंटर येथे स्व. अरण्यऋषी ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मारुती चितमपल्ली यांना श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. 18 जून रोजी संध्याकाळी 7 वाजता त्यांची प्राणज्योत मावळली त्यांनी वयाचे 65 वर्ष ही जंगलात घातली विदर्भात असलेल्या मेळघाट, नवेगाव बांध नागझिरा, अशी अनेक जंगलात त्यांची वास्तव्य होत. त्यांना लहान पना पासून त्याच्या हणमंतमामांनी त्यांना जंगलात नेले तेच त्यांचे दुसरे गुरु ज्यांनी त्यांना वनस्पती, पक्षी झाडे झुडपे या बद्दल माहिती दिली. तेव्हा पासून त्यांना पर्यावरण विषयी आवड निर्माण झाली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश वखरे यांनी चितमपल्ली यांचा जीवनाचा उलगडा करून त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. संचालन गोपाल मांडवकर यांनी केले आभार नितीन क्षीरसागर यांनी केले. या कार्यक्रमाला वन्यजीवरक्षक राकेश झाडे, दीपक जोशी, शुभम घोडे, मोहन पेरकुंडे, प्रशांत वैद्य उपस्थित होते. या शिवाय या जिवरक्षक सेंटर वरील कुत्री, मांजरी यांनीही मुकपणे कार्यक्रमाला हजेरी लावून एकप्रकारे या अरण्यऋषीला श्रद्धांजली अर्पण केली.

