प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे स्वास्थ वृक्ष फाउंडेशन, कॅन्सर कवच द्वारा खासदार अमर काळे, जिल्हाधिकारी श्रीमती वांन्मथी सी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकिला जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, स्वास्थ वृक्ष फाउंडेशनच्या अध्यक्षा दिपीका चंडोक, उपाध्यक्ष अभिषेक चावला, स्वास्थ विभागाचे अधिकारी उपस्थित होते. हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील समुद्रपुर तालुक्यापासून कॅन्सर वॉकसिन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येत आहे. या कार्यक्रमा संदर्भात सविस्तर माहिती अधिकारी यांनी दिली. यावेळी समुद्रपुर तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

