मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- वर्धा जिल्हा हा महाराष्ट्रातील एक कोरडा जिल्हा आहे. म्हणजे तिथे दारूबंदी आहे. 1974 पासून महात्मा गांधी च्या विचारामुळे व स्वातंत्र्य भुदान चळवळीमुळे वर्धा जिल्ह्यात दारू विक्री आणी उत्पादन पूर्णपणे बंद आहे. कायद्याच्या अंमलबजावणी नुसार दारूबंदी असूनही वर्धा जिल्हात काही ठिकठिकाणी सर्रास अवैधपणे दारूची विक्री केली जाते आणी अतीप्रमाण वाढले त्याच्यामुळे अउचित असणारी दारूमुळे जीविताला धोक्याचे संकेत निर्माण होत आहे. कित्येक लोक अउचित दारूनी जीव गमवावे लागत आहे आणी काही पोलीस प्रशासनिक अधिकारी दारूबंदी योग्यवेळेनुसार स्वतःचा फायदा करतांनाही दिसत आहे.
ह्या जिल्ह्यात दारूबंदी असूनही मोठ्या प्रमाणात दारुविक्री आणी वाहतूक होत असल्याने अनेक गुन्हे दाखल झाले आहे. गेल्या वीस वर्षात सरसरी दीडलाखाच्या वरील गुन्हे दाखलं झाले. त्यात काही केसेस निकाली लागल्या व काही 600 ते 700 केसेस सिद्ध झाल्या आणी बाकीच्या केसेस प्रशासनिक लेव्हलवर भ्रष्टाचार झाल्या.
त्यामुळे तर दारूबंदी ठेवण्यात काय अर्थ? त्यापेक्षा दारूबंदी हटवण्यात योग्य राहील. वर्धा जिल्ह्याचे खासदार अमर काळे यांनी दारूबंदी हटवण्यामागे योग्य विचारविनिमय करून पुढाकारचा निर्णय घेतला तो जनतेला उचित आहे. केंद्र व महाराष्ट्र शासनानी येत्या अधिवेशनात योग्य निर्णय घेऊन अधिसूचना जाहीर करावी अशी सर्वस्वी मागणी आहे.

