युवराज मेश्राम प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन कळमेश्वर:- पतंजली योग समिती व महिला योग समितीतर्फे गुरु पूर्णिमा उत्सव चे आयोजन करण्यात आले होते यावेळी श्रीदत्त मंदिर कळमेश्वर सभागृहामध्ये करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. राजीव पोद्दार व प्रमुख उपस्थितीमध्ये श्री धनराज जी देवके माजी कळमेश्वर शहराध्यक्ष (भाजपा), पतंजली योग समिती कळमेश्वर तालुका प्रभारी योगगुरु श्री प्रभाकरराव प्रधान, सह तालुका प्रभारी श्री सुभाषराव पाटणकर, पतंजली योग समितीचे पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष कृष्णाजी बगडे, ज्येष्ठ नागरिक संघटना मार्गदर्शक व सल्लागार ताज मोहम्मद शेख, महिला योग समिती कळमेश्वर तालुका प्रभारी एड. श्रद्धाताई कळंबे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. याप्रसंगी योग गुरू प्रभाकरराव प्रधान व सुभाषराव पाटणकर यांचे शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. डॉक्टर राजीवजी पोतदार आपल्या भाषणात म्हणाले की विश्वगुरू स्वामी रामदेवजी महाराज, आयुर्वेदिक शिरोमणी आचार्य बालकृष्णजी महाराज यांनी योग व प्राणायाम च्या परंपरेला जागतिक पातळीवर नेण्याचे कार्य केलेले आहे. योगामुळे शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्य तंदुरुस्त राहते त्या सोबतच ध्यान धारणा करून आहारावर नियंत्रण ठेवावे तेव्हा जास्तीत जास्त संख्येने दररोज योगाला अंगीकारावे. असे प्रतिपादन केले.
गुरु पौर्णिमा उत्सवात गायत्री परिवार हरिद्वार संचालित नागपूर येथील गायत्री परिवार च्या वतीने एडवोकेट राजेंद्र राठी, प्रकाश कटारिया, पतंजली महिला योग समिती कळमेश्वर च्या ज्येष्ठ योगसाधिका उर्मिलादेवी गौतम यांनी होम हवन करून अध्यात्मिक ऊर्जा निर्माण केली. या कार्यक्रमाचे संचालन माजी सभापती पंचायत समिती कळमेश्वर व योगसाधिका सौ मीनाताई तायवडे यांनी उत्कृष्ट रित्या केले व आभार प्रदर्शन सौ निशाताई चोंदे यांनी मानले.
या कार्यक्रम यशस्वीते करिता सर्व योगसाधक मध्ये सौ अनिता गमे, सुशिला कोल्हे, सौ अंकिता कोल्हे, सौ वंदना प्रधान, सौ रंजनाताई देशमुख सौ वृषाली रोडे, सौ पांडे ताई, खंडार् ताई, सौ रोशनी चांदुरकर सौ वंदना ताई टेकाडे, सौ सिंधुताई धरपाळ, सौ इंदू धार्मिक, सौ कलावती चिमूरकर सुरेखा गुडदे. सविता गणोरकर व इतर योग साधकांनी अथक परिश्रम घेतले.

