विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- काल अहेरी ते बोलेपल्ली बस सेवा पावसामुळे बंद झाली. बस न आल्याने एटापल्ली बसस्थानकावर अनेक विद्यार्थी ताटकळत उभे होते.
ही अडचण लक्षात घेऊन समर्पण सामाजिक संस्था सदस्य संतोष भाऊ गंदेशिरवार यांनी स्वखर्चाने वाहन उपलब्ध करून विद्यार्थ्यांना घरी पोहोचवले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राघवेंद्र सुल्वावार, आतिष खापणे, सुमित नाडमवार, संजय जानकी, महेंद्र सुल्वावार, साई पितुलवार, राहुल करणेवार, सागर भोयर उपस्थित होते.
समर्पण संस्थेचा हा उपक्रम कौतुकास्पद! समर्पण संस्थेचा वतीने अनेक विद्यार्थांना सुरक्षितरित्या त्याच्या घरी नेऊन दिल्याचे सर्वच स्तरातून त्याच्या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.

