अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन सावनेर:- नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात पाटणसावंगी जवळच वाकोडी गावामध्ये पुरातन १२०० वर्ष जुने शिवमंदिर आहे. मंदिर परिसरात गेल्यानंतर निसर्गरम्य परिसर व झाडे झुडुपानी नटलेले सौंदर्य, कन्हान नदी व ओढ्याच्या संगमि तीर्थक्षेत्रावर वसलेले वाकोडी येथील अति प्राचीन शिवमंदिर आहे. या मंदिरात इसन शके १२०० साल असे नाव कोरलेली घंटा ती आता चोरीला गेली या वरून हे शिवमंदिर १२०० च्या आधीच असलं पाहिजे असे अंदाज यावरून मानण्यात येते.
मंदिराची वास्तू भव्य दिव्य असून ४१ फूट उंचीचा भव्य दिव्य कळस आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात स्वयंभू दैदिव्यमान पूज्यनीय लिंग पिंड व शिव पंचायतन आहे.सामोर शोभेदार बैठकी नंदी विनम्र मुद्रेत विराजमान आहे. दक्षिणमुखी हस्त जोडून मारुतीरायाची मूर्ती असून बाजूला श्री.गंगागीर महाराजांची व श्री.तिवारी महाराजांची चीर समाधी आहे.नाग मंदिर व डाव्या बाजूला टीनेचे शेड व निवारा उंच टेकडीवर गिरजा माहेर,पायथ्याशी भुरा भगत, चौरागड निसर्गरम्य वातावरण मंदिराच्या मागच्या बाजूला विहीर व प्राचीन वडाचे झाड आहे.
१६ एकर जागेत असलेले प्राचीन शिवमंदिराच्या अनेक आख्यायिका जोडल्या गेलेल्या आहेत. मंदिरात काळ्या दगडानी बनवलेले भव्य दिव्य शिवपिंड आहे.विशेषता म्हणजे शिवपिंडावर रक्ताचे डाग आहे. प्राचीन काळामध्ये एक गंगागीर महाराज या ठिकाणी राहायचे भक्तांची असता व गावाच्या उद्धार व्हावा म्हणून गाभाऱ्यात त्यांनी अखंड तप चालू केले हट्टी भक्तांनी आत गाभाऱ्यात शिरून महाराजांचे तप भंग केले व महाराजांनी क्रोधाच्या आवेशात येऊन धारदार वस्त्रांनी स्वतःचे शीर छेद करून धडापासून शीर वेगळे केले व त्या पिंडी वरती ठेवले आजही त्या पिंडी वरती रक्ताचे लाल निशाण आहे.
गावकऱ्यांचे व भक्तांचे हे आस्थेव ठेव व ज्ञान, ध्यान , धारणेच पवित्र ठिकाण असून महाशिवरात्रीला मोठा मेळा भरतो.
श्रावण मास सात दिवसाचा सप्ताह असायचा व आता सव्वा दिवसाची अखंड ज्योत व १२ प्रहर घंटा नांद व बालभोजन ट्रस्टीधारा सुरू आहे. मंदिराच्या कळस हा जीर्ण होत आहे. त्याचा जिर्णोद्धार व्हावा व स्वागत महाद्वार बांधकाम परिसर सौंदर्यकरण,सिमेंट रोड, रंगरंगोटी इत्यादी कार्य करण्याच्या मानस पंच कमिटीने हाती घेतला असून समस्त गावकरी, दानदाते,भक्तगण यांच्या सहकार्यातून कार्य संपन्न व्हावे व ऋषीमुनी संत महात्मे समाज सुधारक यांचे मानव जातीवर अनंत उपकार आहे त्यांच्या ऋणातून अंशत: उतराई व्हावी व मानव जातीच्या कल्याण व्हावे करिता आपण समस्त गावकरी, भक्तगण व दानदाते यांनी तन-मन-धनाने सहकार्य करून सफल जीवनाचा आनंद घ्यावा हीच शिवचरणी प्रार्थना आहे.
अशी माहिती पत्रकाद्वारे श्री.शंकर देवस्थान वाकोडी ट्रस्ट पदाधिकारी देविदास मदनकर अध्यक्ष, रघुनंदन पराते उपाध्यक्ष, अतुल बांगरे सचिव, विश्वस्त शंकर खोरगडे, यादवराव कान्होलकर, आशिष राऊत ,शालिकराम बुरडे, देवाजी मदनकर, किशोर बांगरे, प्रभाकर कोहळे, रुपेश मदनकर, श्रीराम गोंडाणे, सुभाष खोरगडे, पुंडलिक पांडे व गावकरी उपस्थित होते.

