संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- इन्फंट जिजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे राष्ट्रीय पालक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका सिमरन कौर भंगू, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापक रफिक अन्सारी उपस्थित होते.
यावेळी चिमुकल्यांनी आपल्या आई, वडीलांचे पूजन केले. यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तसेच चिमुकल्यांनी त्यांच्या आई आणि वडीलांसोबत पारंपरिक पोशाखात रॅम्प वॉक केले. नर्सरीच्या शिक्षिका सीमा सिंग यांनी विनोदी चुटकुले सादर केले. उपस्थित पालकांनी आपल्या मनोगतात विद्यार्थी, शिक्षक यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे संचालन अर्पणा एरकला यांनी तर आभार प्रदर्शन नीता जक्कनवार यानी केले.

