हिंगणघाट तालुक्यातील पुरातन काळातील उत्खनन करून ऐतिहासिक स्थळांचा संरक्षणासाठी एकत्र येण्याचे आव्हान.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आपण सर्वांना हडप्पा, मोहनजोदडो हि संस्कृती माहिती आहे. साडेचार हजार वर्षांपूर्वी ही शहरे लुप्त झाली होती. उत्खननामध्ये हि शहरे पुन्हा आढळून आली आहे अशाच प्रकारची एक मानवी सभ्यता 4000 वर्षांपूर्वी हिंगणघाट परिसरामध्ये राहत होतो, त्या मानवीय सभ्यतेची त्यावेळची स्मशाने (मृत व्यक्ती ला दफन करण्याचे ठिकाण) आता आढळून आले आहे. आढळून आलेल्या स्मशानाला इंग्रजीमध्ये मेगालिथ म्हणतात (Megalith) Mega म्हणजे मोठे, lith म्हणजे दगड मोठया दगडा पासून तयार झालेली स्मशाने त्याला megalith म्हणतात. मेगालिथ अनेक प्रकारचे असते हिंगणघाट परिसरामध्ये असलेले ही स्मशानाला वर्तुळाकार मेगालिथ म्हणतात (stone circle megalith).दगडांची गोल वर्तुळ तयार करून या वर्तुळाचा मध्यभागी प्रेत ठेवायचे अशा प्रकारची मांडणी असलेली स्मशाने हिंगणघाट तालुक्यात प्राचीन मानवी सभ्यतेची साक्ष देत आहे.
आकार वर्तुळाचा आकार हा काही फुटापासून तर काही मीटर पर्यंत असते. दगडी वर्तुळाची रचना गोल आकारात असते दगड काही अंशी जमिनीमध्ये गाडलेले असतात सभोतालचा गाढलेल्या दगडांचे वजन 50 किलो ते 200 किलो पर्यंत असते.
मध्यभागी दफन या स्मशानामध्ये मध्यभागी हाडांचे अवशेष, भांडे अस्थीकलश आढळतात कधीकधी लोखंडी हत्यारे दागिने सुद्धा मिळतात. मेगालिथिक ही एक दफन संस्कार असून पूर्वजांची स्मृती जपण्यासाठी हा दफन विधी केल्या जात असे जगातील अनेक देशांमध्ये अशा प्रकारचे तीन हजार ते चार हजार पूर्वीच्या काळातील मेगालिथीक आढळले आहे. मेगालिथिक चा दगडांमध्ये कप मार्क सुद्धा आढळले आहे. कप मार्क म्हणजे दगडांवर माणसांनी कोरलेले छोटे छोटे छिद्र आहे अनेक तज्ञ लोकांचे मत आहे की हे छिद्र खगोल निरीक्षणाचा आधारावर कोरल्या गेले आहे. या छिद्रांवरून सूर्य, चंद्र तारकांचे स्थान दर्शवतात यांच्यातून नक्षत्र व वार्षिक सौर चक्र समजूत येऊ शकते असं अनेक तज्ञांचं मत असलं तरी ते सिद्ध झालेलं नाही तर काहींचं असं मत आहे या प्रकारे कप मार्क म्हणजे दगडावर छिद्र करून मृत व्यक्तीला त्या छिद्रा मध्ये नैवेद्य अर्पण केल्या जात असावं. खाद्य सामग्री, डाळ, धान्य आणि पूजेची सामग्री त्या छोट्या छोट्या छिद्रामध्ये ठेवून ती मृत व्यक्तीला अर्पण केल्या जात असावी. या दिशेने वैज्ञानिक संशोधन सुरू आहे.
हिंगणघाट परिसरामध्ये 4000 वर्षांपूर्वीचे स्मशाने आढळली आहे याचा अर्थ 4000 वर्षांपूर्वी हिंगणघाट परिसरामध्ये मानवी वस्ती अस्तित्व होती. या गोष्टीचा सर्व हिंगणघाटकरांना अभिमान असला पाहिजे की आमच्या अस्तित्व हे आजचं नाही तर सर्वात जुनं 4000 वर्षांपूर्वीच अस्तित्व आहे यासाठी या प्राचीन मेगालिथिकला जपण्याचं, त्यांचं संवर्धन करण्याचं, त्यांचं रक्षण करने आवश्यक आहे. याकरिता प्रत्येक हिंगणघाट करांनी त्याचा संरक्षणासाठी पाऊल उचलले पाहिजे. मेगालिथीक पाहून पूर्णपणे व्यवस्थित तुम्हाला ते समजून घ्यायचं असेल तर या मेगालिथीक ला एकदा आवश्यक भेट द्या. मेगालिथीक पाहण्याचा सर्वात उत्तम काळ म्हणजे मार्च ते मे महिना या दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारचे झाडं झुडपं गवत त्या ठिकाणी राहत नाही आणि त्याच्यामध्ये मेगालिफिक हे अगदी स्पष्टपणे आपल्याला दिसून येते. त्या ठिकाणी असलेल्या गवत आणि झूडपा मुळे इतके वर्ष हि मेगालिथीक स्मशाने लोकांन पासून लपून राहिली आहे.
सामाजिक व पुरातात्विक महत्त्व हे स्थळ इसवी सन पूर्वीचे असून पूर्व लोखंडयुगीन काळातील (early iron age) आहे. हे स्थळ सामाजिक दफन संस्काराचे प्रतिनिधित्व करते. या ठिकाणी असलेल्या अवशेषांवर कार्बन डेटिंग करण्यासाठी पुढील अभ्यासाची गरज आहे ही स्मशाने अति प्राचीन असून पुरातत्त्व विभागाने याची दखल घेऊन अधिक संशोधन करून अधिक खोलात अभ्यास करून माहिती मिळवणे आवश्यक आहे. काही अभ्यासकांचा मताप्रमाणे ही स्मशाने 3000 वर्षे जुनी असावी परंतु बेसाल्टच्या काळ्या दगडाची झालेली धूप (झिज) पाहता ही स्मशाने 4000 वर्षांपूर्वीची असावी असे प्रविण कडू यांचे मत आहे.
हिंगणघाटकरांना आवाहन हिंगणघाट जवळ असलेल्या ऐतिहासिक स्थळांचा संरक्षणासाठी हिंगणघाटचा नागरिकांनी एकत्र येऊन सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी मी आपणास आवाहन करतो की आपण आपला व्हाट्सअप नंबर मला द्यावा एक ग्रुप बनवून त्या ग्रुपच्या माध्यमातून प्रशासनाला निवेदन देऊन हिंगणघाट परिसरात आणि हिंगणघाट शहरांमध्ये असलेल्या ऐतिहासिक स्थळांचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करता येईल.
मेगालिथीकचा संरक्षणासाठी येसंबा येथील पंचशील थुल प्रयत्न करीत आहे. तुम्हाला हि प्राचीन मेगालिथीक पाहायची असेल तर मार्च ते मे महिन्यात माझ्या सोबत किंवा पंचशील थुल यांच्या बरोबर 7769026796 वर संपर्क करून हे पाहता येईल असे प्रविण कडू यांनी महाराष्ट्र संदेश न्युजशी बोलताना सांगितले.

