प्रदीप खापर्डे, नागभीड तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागभीड:- 27 जुलै रोजी नागभीड खरेदी विक्री सोसायटी च्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ब वर्ग वैयक्तिक प्रतिनिधी गटातून भाजपा व मित्र पक्षाचे उमेदवार संजय होमराज गजपुरे, दिगंबर दादाजी गुरपुडे, रमेश पांडुरंग बोरकर, डोनू धनुजी पाकमोडे, यांचा विजय झाला तर ओबीसी गटातून संजू उरकुडे यांचा विजय झाला.
या आधी सोसायटी गटातून रवींद्र आंबोरकर व आनंद कोरे अनुसूचित जाती जमाती गटातून राहुल विश्वनाथ सवाईकर भटके विमुक्त गटातून चंद्रशेखर श्रीधर विगम महिला राखीव गटातून माला शांताराम देशमुख व विना अतुल चिल्लूरे यांची अविरोध निवड झाली होती तालुक्यातील शेतकऱ्यांची संस्था समजल्या जाणाऱ्या या सोसायटीच्या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले होते. भाजपाने प्रथमच या सोसायटीत शिरकाव करीत यश संपादन केले आहे. निवडणुकीत दणदणीत विजय मिळविल्यानंतर भाजपा कार्यालयात या विजयाचे शिल्पकार माननीय आमदार बंटी भाऊ भांगडिया यांच्या हस्ते नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला.
सध्या दुर्लक्षित असलेल्या या सोसायटीला यापूर्वीचे वैभव नवीन संचालक मंडळ प्राप्त करून देतील अशी आशा संस्थेचे सभासद व शेतकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहे.

