युवराज मेश्राम, प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन कळमेश्वर:- तालुका शेतकी खरेदी विक्री सोसायटी. संदर्भात. ३० जुलै रोजी संस्थेचे सभासद सदस्य व शेतकरी वर्गाच्या वतीने कळमेश्वर येथील निषादत्त सभागृहात झालेल्या पत्र परिषदेमध्ये १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५पर्यंतच्या खताच्या व औषधीच्या विक्रीमध्ये एकूण ४३ लाख ९५ हजार ३०४ रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप पत्र परिषदेमध्ये करण्यात आला. कळमेश्वर तालुकास्थळी गेल्या ६५ वर्षापासून शासकीय माफक दराने शेतकऱ्यांना खते व औषधे. तसेच शेती उपयोगी साहित्य मिळण्याचे एकमेव स्थान म्हणून नावलौकिक प्राप्त आहे.
या संस्थेचे अध्यक्ष म्हणून बाबाराव कोढे, उपाध्यक्ष आशिष गोविंदराव देशमुख व इतर संचालक मंडळ कार्यरत असून उपरोक्त संस्थेचे कळमेश्वर शहरासह तालुक्यात एकूण ९ युनिटे खरेदी विक्रीच्या सोसायटीच्या संचालक मंडळाचे देखरेखी खाली सुरू आहे. यामध्ये कळमेश्वर येथे २ उपरवाही, उबाळी, कोहळी, धापेवाडा, मोहपा, तोंडाखैरी, लोहगड यामधील धापेवाडा युनिट मध्ये देविदास वडगुजी निकोसे कर्मचारी आहेत, तर संस्थेचे व्यवस्थापक म्हणून अरुण यादवराव कोल्हे हे काम पाहतात व्यवस्थापक अरुण कोल्हे यांनी धापेवाडा युनिटमध्ये १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ पर्यंत खते व औषधीच्या विक्रीमध्ये एकूण. ४३ लाख ९५ हजार ३०४ रुपयांचा आर्थिक घोटाळा झाला असल्याने धापेवाडा युनिट हे सावनेर पोलीस स्टेशन हद्दीत येत असल्याने दिनांक १२ एप्रिल २०२५ ला सावनेर पोलिसात तक्रार दाखल केली.
काल दि.३० जुलै रोजी झालेल्या पत्र परिषदेमध्ये उपस्थितानी आर्थिक घोटाळा विद्यमान संचालक मंडळाच्या संगनमताने झाला असून धापेवाडा युनिटमध्ये निव्वळ ४३ लाख ९५ हजार ३०४ रुपये पर्यंत मर्यादित नसून इतरही ८ युनिटमध्ये हा आर्थिक घोटाळा करोडो रुपयाच्या घरात असल्याची दाट शक्यता वर्तवली आहे. हा घोटाळा इथेच न थांबता संस्थेमधील संचालक मंडळ यांचे प्रवास भत्ते व इतर खर्चात भरमसाठ वाढ करून व अन्य विविध कार्यक्रमाचा खर्च दाखवून संस्थेमधूनच केल्या जात असल्याचा गौप्यस्फोट ही त्यांनी केला याबाबतची तक्रार विभागीय सहनिबंधक नागपूर व जिल्हा उपनिबंधक नागपूर यांचे कडे करून सुद्धा आज पर्यंत कुठलीही ठोस कारवाई केली नसल्याचे सांगितले.
नागपूर जिल्ह्याचे काँग्रेसचे माजी मंत्री व माजी आमदार यांच्या अधिपत्याखाली हीं संस्था चालत असून राजकीय दबावापोटी अधिकारी वर्ग या घोटाळ्याकडे दुर्लक्ष करीत आहेत त्यामुळे या घोटाळ्याची उच्चस्तरीय तसेच एसआयटी मार्फत चौकशी करून संचालक मंडळ बरखास्त करावे प्रशासकाची नेमणूक करावी. अशी मागणी यावेळी करण्यात आली.
कळमेश्वर खरेदी विक्री संस्थेच्या गेल्या ६५ वर्षाच्या कार्यकाळात पहिल्यांदाच कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता या आर्थिक घोटाळ्याची संस्थेचे विद्यमान व्यवस्थापक अरुण कोल्हे यांनी सावनेर पोलिसात तक्रार दाखल करण्याचे धाडस दाखविले हे विशेष. आयोजीत पत्रकार परिषदेला प्रकाश नथुजी पांडे ,मोरेश्वर धोटे , इमेश्वर यावलकर, प्रमोद हत्ती ,स्वप्निल चौधरी ,शरद ठाकरे, सरपंच वाढोणा (बुजुर्ग) रोशन भालेराव आदींचा समावेश होता.

