संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- देशाचे विरोधी पक्षनेते, काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांनी नुकतेच बेंगलुरु येथे पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रीय स्तरावरील प्रसार माध्यमांसमोर लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतांची चोरी याबाबत सबळ पुराव्यासह भांडाफोड केला असून त्यांचा यासंदर्भातील युट्यूब व्हिडिओ चे प्रसारण चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आशिफाबाद रोडवरील राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक माजी नगराध्यक्ष अरूणभाऊ धोटे यांच्या मालती सदन (डॉ. बांबोडे जुना दवाखाना) येथील नवीन काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात खासदार राहुल गांधी यांची पत्रकार परिषद प्रसारण व विश्लेषण करून मतांच्या चोरी’ची सत्यता काँग्रेस कार्यकर्त्यांनी जानुन घेतली.
यावेळी भविष्यात मत चोरी सारखे प्रकार घडू नयेत यासाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन माजी आमदार सुभाष धोटे यांनी कार्यकर्त्यांना केले, तसेच यानंतर राजुरा तालुका काँग्रेसच्या वतीने उपविभागीय अधिकारी रवींद्र माने यांना निवेदन देऊन विरोधी पक्षनेते खा. राहुलजी गांधी यांच्या आरोपांसंदर्भात तसेच राजुरा विधानसभा निवडणूकीत बोगस मतदार नोंदणी ची निष्पक्षपाती चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करून लोकशाही व संविधान संरक्षण करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, एड. अरुण धोटे, माजी उपनगराध्यक्ष सुनिल देशपांडे, युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, सभापती विकास देवाळकर, शब्बीर पठाण, साईनाथ बत्तकमवार, महिला तालुकाध्यक्ष निर्मला कुडमेथे, माजी नगरसेवक प्रभाकर येरणे, श्याम गरडे, अभिजित धोटे, किशोर बानकर, दिनकर कर्नेवार, विनोद झाडे, सिद्धार्थ राहुलगडे, महादेव ब्राह्मणे, शफीक सय्यद, एजाज अहमद, ओबीसी काँग्रेसचे नंदकिशोर वाढई, तुकाराम माणूसमारे, अनुसूचित जाती विभाग काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कोमल फुसाटे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष इर्शाद शेख, अनंता एकडे, कवडू सातपुते, महेश वासेकर, सौरभ वाटेकर, विजय पिंगे, संजय मुसळे, संदीप नन्नवरे, पुनम गिरसावळे, इंदुताई निकोडे, गंगाराम हिंगणे, जंगू एडमे, कामिना उईके, मनीषा देवाळकर, योगराज, प्रवीण चिडे, मंगेश गुरनुले, धनराज चिंचोलकर, रामभाऊ धुमणे, आकाश माऊलीकर यासह राजुरा तालुका काँग्रेस व काँग्रेसच्या विविध ऑर्गनायझेशनचे प्रमुख नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

