79 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष येंकटेश अर्का यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न.
मधुकर गोंगले, उपसंपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन:- आज देशात 79 वा स्वातंत्र्य दिवस मोठया उत्साहात साजरा केला जात आहे. त्यात अहेरी तालुक्यातील राजाराम येथे राजे भगवंतराव आश्रम शाळेत स्वातंत्र्य दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष येंकटेश अर्का यांनी उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी ग्रामपंचायत सरपंच तथा सदस्य विनायक आलाम तसेच पत्रकार सुरेश मोतकूरवार, पत्रकार मधुकर गोंगले तसेच गावातील नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते. तर शाळेचे मुक्याध्यापक तिरुपती ओडनलवार, प्रवीण गोंडाने, सुदर्शन वासाडे, गोवर्धन कापटे, सुभाष मेश्राम, समशीदखान पठाण, नागेश मडावी, सत्यनारायण ओडणालवार, अधीक्षक प्रफुल गेडाम, अधीक्षका शितल होके मॅडम, रवि गुडीमेटला सर,गणेश्याम बोरकर, सम्मुला पठाण, अनिल आत्राम, विनोद सडमेक राजना रार्चालावार, सुरेश जाकेवार, वच्छला बोम्मावार, प्रतिभा अलगमकर आदी कर्मचारी उपस्थित होते.
राजाराम रुग्णालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
राजाराम येथील आरोग्य पथक रुग्णालयात पोलीस प्रभारी अधिकारी यांच्या अध्यक्षेतेखाली स्वातंत्र्य दिन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आनंद आवारे उपस्थित होते तर आरोग्य अधिकारी डॉ. राजेश मानकर यांचे हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पाडण्यात आला. यावेळी उपस्थित नंदकिशोर पुण्यमूर्तीवार व आरोग्य विभागातील अधिकारी औषधी निर्माण अधिकारी मयूर बंगाले, स्वप्नील वंजारी, वालदे, आरोग्य सेविका निता रामटेके, आरोग्य सेवक प्रफुल सिडाम, आरोग्य सेविका कल्पन्ना घरत, स्वाती परवते, अनिल धानफुले, रंजना दुर्गे, प्रेमीला आत्राम व इतर कर्मचारी उपस्थित होते.आणि राजाराम पोलीस स्टेशन मध्ये प्रभारी अधिकारी आनंद आवारे यांचे हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न करण्यात आले आहे.
या वेळी उपस्थित भगवंतराव आश्रम शाळेतील विध्यार्थी व सर्व शिक्षकवृंद आणि आरोग्य विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळा राजाराम येथील शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष अरविंद परकीवार यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे. या वेळी उपस्थित अहेरीचे माजी पं. स. सभापती भास्कर भाऊ तलांडे उपस्थित होते. तसेच गावातील प्रतिष्टीत नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी, शाळा व्यवस्थापक समितीचे पदधिकारी व शिक्षकवृंद उपस्थित होते. व ग्रामपंचायत राजाराम येथे गावातील सरपंचा मंगलाताई आत्राम यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आले आहे.
या वेळी उपसरपंच रोशन कंबगोणीवार ग्राम पंचायत सदस्य रमेश पोरतेट, विनायक आलाम, सुरक्षा आकदर, यशोदा आत्राम, संजावली अरगेला, पुजा सडमेक, सचिव करसे साहेब, तसेच जि.पं. शाळेतील विध्यार्थी, आंगणवाडी विध्यार्थी, गावातील जेष्ठ नागरिक, मोठया प्रमाणात उपस्थित होते.

