मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट शहरासाठी विकासाच्या इतिहासातील एक संस्मरणीय क्षण ठरला. या दिवशी हिंगणघाट नगर परिषदेच्या नव्याने बांधलेल्या प्रशासकीय इमारतीचे तसेच इमारतीतील आंतरिक साजसज्जा, बैठक व्यवस्था आणि संपूर्ण विद्युतीकरणाच्या कामाचे लोकार्पण एका भव्य समारंभात पार पडले. या सोहळ्याला राज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर आणि वर्धा लोकसभेचे खासदार अमर काळे आमदार समीर कुणावार उपस्थित होते. त्यांच्यासोबत स्थानिक मान्यवर, नगरसेवक, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, व्यावसायिक आणि हिंगणघाटचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नवीन प्रशासकीय इमारत केवळ एक कार्यालयीन जागा नसून, ती हिंगणघाट शहराच्या सर्वांगीण विकासाची, पारदर्शक प्रशासनाची आणि नागरिकाभिमुख सेवांची नवी ओळख ठरणार आहे. प्रशस्त आणि सुबक डिझाइन, अत्याधुनिक बैठक सुविधा, उर्जासंवर्धन लक्षात घेऊन केलेले आधुनिक विद्युतीकरण, तसेच दिव्यांगांसाठी सुलभ प्रवेश व्यवस्था यामुळे या इमारतीतून होणारे प्रशासनिक कामकाज अधिक वेगवान, कार्यक्षम आणि नागरिकांसाठी सोयीस्कर होईल.
यावेळी खासदार अमर काळे यांनी मुख्याधिकारी यांना त्यांचे नांव प्रोटोकॉल प्रमाणे कुठ असावसास पाहिजे हा प्रश्न विचारून त्यांची भर सभेत फिरकी घेतली. पण शेवटी नगर पालिकेच्या मुख्याधिकारी यांनी आपली चूक कबूल केली.
वर्धा जिल्ह्याचा खासदार असावा तर असा निर्भिष्ट व बिनधास्त. नगरपरिषद नवीन इमारत लोकार्पणच्या शासकीय कार्यक्रमात हिंगणघाट च्या विकास कामावर व जिल्ह्याचा विकास निधी देण्याचा बाबतीत खासदार सोबत दूजाभाव ह्या संदर्भात वर्धा जिल्हा पालकमंत्री, आमदार हिंगणघाट ह्यांना त्यांचाच समोर खडे बोल सुनावले. आणि हिंगणघाटच्या एका मोठ्या नेत्याचा दबावामुळे लोकप्रतिनिधी साठी असलेला प्रोटोकॉल न पाळल्यामुळे खासदार ह्यांचा अपमान झाला त्याबद्दल सर्व लोकांसमोर भर कार्यक्रमात मुख्याधिकारी हिंगणघाट ह्यांना माफी मागायला लावली.

