मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तहसील कार्यालय हिंगणघाटचे प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात आयोजित 79 व्या स्वातंत्र्य दिन समारोहत उपविभागीय अधिकारी हिंगणघाट आकाश अवतारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार, माजी आमदार राजू तिमांडे, तहसीलदार योगेश शिंदे सह सर्व विभाग प्रमुख तहसील कार्यालयातील सर्व नायब तहसीलदार निरीक्षण अधिकारी, कर्मचारी रुंद तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक, शालेय विद्यार्थी होमगार्ड पथक, पोलीस पथक उपस्थित होते.
याप्रसंगीत आयोजित समारोहात तहसील कार्यालया द्वारे विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते 80 दिव्यांग, दुर्धर आजारी आर्थिक दुर्बल लाभार्थ्यांना अंत्योदय अन्न योजनेचा लाभ देण्यात आला. लाभार्थ्यांना 35 किलो धान्याचा लाभ सुरू करण्यात आला. तसेच आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची किटचे वाटप करण्यात आले. हिंगणघाट शहरातील नागरिकांना तसेच सिंदी रेल्वे येथील नागरिकांना जमिनीचे अखीव पत्रिकांचे सुद्धा वितरण मान्यवारांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे संचालन दत्ता भांगे व संगीता पेठे आणि प्रास्ताविक तहसीलदार योगेश शिंदे यांनी केले. भारत विद्यालय हिंगणघाट च्या विद्यार्थ्यांनी पथसंचालन तसेच गायनाद्वारे कार्यक्रमाची शोभा वाढवली. या प्रसंगी मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती. तसेच यापुढेही तालुका प्रशासना तर्फे विविध योजनांचा जनसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल अशी हमी उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे यांचेमार्फत देण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तहसीलदार योगेश शिंदे यांच्या नायब तहसीलदार श्री भलावी, श्री. राऊत, श्री काडवाजीवार, निरीक्षण अधिकारी गौरव भांडेकर तसेच तहसील कार्यालयातील कर्मचारी रुंद यांनी सहकार्य करून समारंभ यशस्वीरित्या पार पडला.

