मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या भावाला रक्षाबंधनाचे औचित्य साधून हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील लाडक्या भगिनींनी रक्षाबंधनाच्या शुभेच्छांसह मोठ्या प्रमाणात राख्या पाठविल्या आहेत, सुमारे ३६०६ राख्याचासमावेश असलेले हे बॉक्स हिंगणघाट शहराच्यावतीने वर्धा येथे आजच पाठविण्यात आला आहे.
काल आमदार समिर कुणावार यांचे स्थानिक जनसंपर्क कार्यालयात एकत्रित होऊन नियोजन केले. राज्याचे मुख्यमंत्रीपदी आरूढ असलेल्या या पितृतुल्य भावास उत्तम आरोग्य लाभो, त्यांची किर्ती अबाधित राहो, अशी ईश्वरचरणी मनोकामना करीत शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी आमदार समीर कुणावार यांच्या सुविद्य पत्नी सौ. श्रद्धाताई कुणावार, संयोजिका सौ. रविला आखाडे, सहसंयोजिका सौ. वंदना कामडी, भाजपा महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा सौ. शारदा पटेल, महिला मोर्चा हिंगणघाट ग्रामीण तालुकाध्यक्षा सौ. किर्ती सांयकाऱ इत्यादी मान्यवर भगिनी उपस्थित होत्या.

