विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन देसाईगंज:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श भूमी दिक्षाभूमी देसाईगंज येथे आ.रामदासजी मसराम यांच्या हस्ते तिरंगा फडकाविण्यात आला यावेळी त्यांच्या समवेत सम्यक जागृत बौद्ध महिला समिती घ्या उपाध्यक्षा रत्नमाला बडोले उपस्थित होत्या. सकाळी बरोबर ७.४५ वा. ध्वजारोहण करण्यात आले व तिरंग्याला सलामी देण्यात आली पश्यात राष्ट्रगीत गायन करण्यात आले. त्यानंतर सर्वांनी मिळून संविधान प्रास्ताविकेची शपथ घेतली व सर्वांना खाऊ वाटप करण्यात आले.
याप्रसंगी समता सैनिक दल शाखा आंबेडकर वार्ड पुरुष व स्त्रीया यांच्या कडून तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. या समारंभाला सम्यक जागृत बौद्ध महिला समितीच्या अध्यक्षा ममता जांभूळकर सचिव श्यामला राऊत सल्लागार मारोती जांभूळकर व सदस्य सरीता बारसागडे, गायत्री वाहाने, लीना पाटील, प्रतिभा बडोले, आशा रामटेके, श्रध्दा मेश्राम, रश्मी गेडाम, ममता रामटेके, सखी मंच संयोजका कल्पना कापसे, सोमवती लंजे तसेच पवन गेडाम, लिंगायत व शहरातील प्रतिष्ठित नागरिक बहूसंखेने उपस्थित होते.

