संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 20:- राजुरा आधुनिकक भारताचा भक्कम पाया रचणारे भारतीय तंत्रज्ञान व संगणक क्रांतीचे प्रणेते माजी पंतप्रधान भारतरत्न राजीवजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वय माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस जनसंपर्क कार्यालय राजुरा मालती सदन आशीर्वाद रोड राजुरा येथे सकाळी ठीक अकरा वाजून 30 मिनिटांनी सद्भावना दिवस साजरा करण्यात आला त्यानिमित्त भारतरत्न राजीव गांधी पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी राजुरा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रंजन लांडे बाजार समिती सभापती विकास देवाळकर जास्विंदर सिंग धोतरा माजी नगरसेवक हरजीत सिंग संधू माजी नगरसेवक संतोष मेश्राम जिल्हा महासचिव जयहमत कुंदन व्यंकटवार सतीश नक्षीने मनीष वांढरे प्रीतम झाडे सुमित भालके अभय डाकरे अविनाश कदमवार पवन जाधव यासह राजुरा काँग्रेसच्या फ्रंटला ऑर्गनायझेशन पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

