Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत संगमनेर नगर परिषदेने पश्चिम विभागात देश पातळीवर 3 क्रमांक पटकाविला.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 4, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत संगमनेर नगर परिषदेने पश्चिम विभागात देश पातळीवर 3 क्रमांक पटकाविला.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी

संगमनेर :- केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत संगमनेर नगर परिषदेने पश्चिम विभागात देश पातळीवर 3 रा क्रमांक प्राप्त पटकाविल्याची माहिती संगमनेर नगरपरिषदेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे व मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली.

केंद्र शासनाच्या वतीने देश पातळीवर सर्व राज्यातील नगर परिषदांसाठी स्वच्छ सर्वेक्षण 2022 अभियान राबविण्यात येत आहे. शासनाच्या या स्पर्धात्मक उपक्रमामध्ये संगमनेर नगरपरिषद सहभागी झाली होती. यामध्ये कचरामुक्त शहरांतर्गत थ्री स्टार, हागणदारीमुक्त शहरांतर्गत ओ.डी.एफ तसेच स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत देश पातळीवर पश्चिम विभागात तिसर्‍या क्रमांकाचे मानांकन संगमनेर पालिकेने पटकाविले आहे.

नगर परिषदेच्या वतीने शहरातील नागरिकांना मुलभूत सेवा- सुविधा पुरविल्या जातात. शहरात दैनंदिन नियमित स्वच्छता केली जाते. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत घरोघरी घंटागाडी पाठवत ओला, सुका कचरा असे वर्गीकरण केले जात आहे. कचरा कुंडीमुक्त शहर म्हणून संगमनेर शहराची ओळख निर्माण झाली आहे.

ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करून नगरपरिषदेच्या मार्फत सेंद्रिय खताची निर्मिती करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाचे ‘हरित ब्रँड’ दर्जाचे मानांकनसुद्धा पालिकेने प्राप्त झाले आहे. शेतकर्‍यांसाठी अतिशय उपयुक्त खत म्हणून या खताची विक्री केली जात आहे. माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या संकल्पनेतून स्वच्छ, सुंदर अन् हरित संगमनेर ही संकल्पना घेऊन स्वच्छतेबरोबरच शहरात इतरत्र वृक्षारोपण करण्यात आले आहे.

स्वच्छतेबाबत नगरपरिषदेने शासन पुरस्कृत स्पर्धेत सहभागी होऊन संत गाडगे बाबा नागरी स्वच्छता अभियान, महाराष्ट्र शासन उत्कृष्ट नगरपरिषद पुरस्कार, स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत जी .एफ .सी स्टार रेटिंग, ओडीएफ प्लस- प्लस अंतर्गत भारतात पश्चिम विभागात पाचवा क्रमांक तर अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महिला आणि बालकल्याण विभागाचा उत्कृष्ट पुरस्कार, माझी वसुंधरा अभियान अंतर्गत दुसरा क्रमांक, माझी वसुंधरा अभियानांतर्गत नाशिक विभागात अत्कृष्ट पुरस्कार मिळविल्याने शासनाच्या वतीने संगमनेर नगर परिषदेचा गुण गौरव करण्यात आला.

स्वच्छ सर्वेक्षणसाठी मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उप मुख्याधिकारी सुनील गोरडे, कार्यालय निरीक्षक राजेश गुंजाळ, आरोग्य प्रमुख अश्विन पुंड, प्र. निरीक्षक अरविंद गुजर यांच्यासह उमेश ढोले, संगणक अभियंता विशाल कोल्हे, गौरव मंत्री, सुरेश चिंचे, बाळासाहेब साळवे, शशिकांत जोशी यांनी परीश्रम घेतले.

आता प्रथम क्रमांकाचे मानांकन मिळविणार!
स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत संगमनेर नगर परिषदेने पश्चिम विभागात तिसरा क्रमांक पटकाविला. यामध्ये सर्वांचेच योगदान आहे, परंतु आता संगमनेर नगर परिषदेला प्रथम क्रमांकाचे मानांकन मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे नगर परिषदेचे प्रशासक डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी सांगितले.

Previous Post

हिंगणघाट: देशासाठी लढणाऱ्या सेवेतून निवृत्त झालेल्या वीर जवानांचा प्रहारच्या वतीने सत्कार

Next Post

अहमदनगर: अल्पवयीन मुलींना फसवून तिच्याशी निकाह करून अत्याचार, मग तिला विकल कुंटणखान्यात.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
अहमदनगर: अल्पवयीन मुलींना फसवून तिच्याशी निकाह करून अत्याचार, मग तिला विकल कुंटणखान्यात.

अहमदनगर: अल्पवयीन मुलींना फसवून तिच्याशी निकाह करून अत्याचार, मग तिला विकल कुंटणखान्यात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In